नेदरलँड विरुद्ध आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने त्याच्या क्रिकेटच्या पराक्रमाची आणखी एक झलक दाखवली आहे. विराट कोहली त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील उत्कृष्टतेसाठी ओळखला जातो. आजच्या सामन्यात विराट कोहलीने विकेट घेत नवीन विक्रम केला आहे. यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रेक्षक आनंदित झाले आहे. कोहलीने नेदरलँडसचा कर्णधाराला माघारी धाडले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कोहलीने विकेट घेताच अनुष्का शर्माला हसू आवरता आले नाही. डावाच्या २५व्या षटकात कोहलीने नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसला यष्टिरक्षणात झेलबाद केले. भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात कोहलीने विकेट घेतल्याने संपूर्ण स्टेडियमला आनंद झाला होता. तर मिसेस कोहली अनुष्का शर्माची स्टेडियममधून मॅच पाहतानाची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. विराट कोहलीने ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेतली आहे. वर्ल्डकपमधील ही त्याची पहिली विकेट आहे. त्याने डच कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला बाद केले. याआधी कोहलीने २०१४ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये विकेट घेतली होती. दरम्यान आजच्या सामन्यात नंतर कर्णधार रोहित शर्मानेही शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना काही षटके दिली आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pjLfHeM
No comments:
Post a Comment