Breaking

Thursday, December 21, 2023

सुधाकर बडगुजरांची आज ACBकडून चौकशी; नाशिक महापालिकेतील अपहारसंदर्भात कार्यवाही https://ift.tt/9SX7MAD

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : नाशिक महापालिकेतील अपहार, फसवणूक व बनावट दस्तऐवजीकरणासंदर्भात माजी नगरसेवक तथा शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज, शुक्रवारी (दि. २२) लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंदर्भात प्राप्त तक्रारीनुसार तपास करून सरकारवाडा पोलिसांत संशयित बडगुजर यांच्यावर अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. बडगुजर यांच्यासह दोघांवर ‘एसीबी’ने रविवारी (दि. १७) सायंकाळी अपहाराचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सन २०१६ मध्ये बडगुजर यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून ‘एसीबी’कडे अपहाराबाबत खुली चौकशी सुरू होती. चौकशीअंती बडगुजर यांच्यासह संशयित साहेबराव शिंदे आणि सुरेश चव्हाण यांच्यावर नोंदविण्यात आला आहे. नगरसेवकपदावर असताना महापालिकेत कोणतेही कॉन्ट्रॅक्ट घेता येत नाही. परंतु, बडगुजर यांनी संबंधित कंपनीला महापालिकेचे ठेके मिळवून दिले. स्वत: कंपनीमार्फत सन २००६ ते २००९ या कालावधीत ३३ लाख ६९ हजार ४३९ रुपये स्वीकारून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतल्याची तक्रार आहे. दरम्यान, आपण कोणताही अपहार केला नसल्याचा दावा बडगुजर यांनी केला असून, आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.१९९२ पासूनच्या व्यवहारांची चौकशीया गुन्ह्यासंदर्भात विभागाने बडगुजर अँड बडगुजर कंपनीच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९२ पासूनच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यासंदर्भातील चौकशीवेळी ते कोणती कागदपत्रे सादर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बडगुजर यांच्या घर आणि कार्यालयातून गुन्ह्याशी संदर्भात महत्त्वाची कागदपत्रे यापूर्वीच ताब्यात घेतली गेली आहेत.गुन्हे शाखेकडून चौकशी नाहीकुख्यात सलीम कुत्तासोबतच्या पार्टी प्रकरणात गुन्हे शाखेने गुरुवारी अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदविले. इतर पुरावे शोधण्यासाठी गुन्हे शाखेने प्रयत्न केले. त्यामुळे गुरुवारी बडगुजर यांची चौकशी झाली नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vOioetT

No comments:

Post a Comment