Breaking

Friday, December 22, 2023

गेले तीन, चार महिने आव्हानात्मक, शतकानंतर संजू सॅमसनची प्रतिक्रिया चर्चेत, वाचा नेमकं काय म्हणाला? https://ift.tt/KPVBYGO

मोक्याच्या क्षणी संयमी शतक करत भारतीय संघाला तारणाऱ्या संजू सॅमसनसाठी गेले तीन, चार महिने आव्हानात्मक होते. या कठीण काळातही त्याने स्वतःवर मेहनत घेतली. ज्याचा सकारात्मक परिणाम दिसला. यंदा भारतातच पार पडलेल्या वनडे वर्ल्ड कपच्या टीम इंडियात संजू सॅमसन नव्हता. निवड समितीने त्याच्याऐवजी ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना प्राधान्य दिले.‘गेल्या तीन, चार महिन्यांतील आव्हानात्मक स्थिती बघता इथे झालेले शतक खूप मोठी बाब आहे. मला क्रीडा संस्कृतीचा वारसा लाभला आहे. माझे वडीलही खेळाडू होते. बघायला गेले तर प्रत्येक धक्क्यानंतर सावरत पुनरागमन करणे हा एकमेव पर्याय खेळाडूपुढे असतो. अन् त्याने तो सकारात्मकतेने स्वीकारायला हवा. स्वतःवर मेहनत घ्यायची आणि पुनरागमनासाठी प्रयत्न करत राहायचे’, असे सॅमसन म्हणाला. दरम्यान भारताविरुद्धच्या दोन कसोटींच्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी कसोटीपटू डीन एल्गर निवृत्त होणार आहे. माजी कर्णधारानेच ही माहिती दिली. सलामीवीर एल्गरने २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करत ८४ कसोटींत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्याने १३ शतके, २३ अर्धशतकांसह ५१४७ कसोटी धावा फटकावल्या आहेत. त्याला आठ आंतरराष्ट्रीय वनडेंचाही अनुभव आहे. एल्गरने १७ कसोटींमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. त्याच्यानंतर नेतृत्वाची धुरा तेम्बा बवुमाकडे आली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ayW84C9

No comments:

Post a Comment