Breaking

Friday, December 1, 2023

Good News : निकालाआधीच मोदी सरकारसाठी ५ आनंदाच्या बातम्या, खुद्द पंतप्रधान म्हणाले - भारताची ताकद! https://ift.tt/MSgl8dw

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशाच्या राजकारणामध्ये मोठी उलाढाल झाल्याचं पाहायला मिळालं. अर्थव्यवस्था आणि राजकारणाच्या आघाडी करून मोदी सरकारसाठी पाच चांगल्या बातम्या समोर आल्या आहेत. प्रत्यक्षात काही महिन्यांनी देशांमध्ये लोकसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपसह सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे सेमी फायनल म्हणून बघितलं जातं. अशात चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये उत्कृष्ट जीडीपी विकास दराने सरकारचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. अशा कोणत्या ५ घटना आहेत, त्यामुळे मोदी सरकारसाठी चांगल्या ठरणार? वाचुयात...१. दुसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट जीडीपी वाढीचा दर : ३० नोव्हेंबरला जीडीपीचे आकडे जाहीर होताच काही वेळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.२. शेअर बाजाराने रचला इतिहास : चालू आठवडा शेअर बाजारासाठी खूप चांगला गेला. आठवड्याच्या सुरुवातीला बाजाराने ४ ट्रिलियन रुपयांच्या मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला. जगातील पाच सर्वात मोठ्या शेअर बाजारांमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. ३. औद्योगिक उत्पादनाला गती : ऑक्‍टोबर महिन्‍यात कोर सेक्‍टरमधूनही उत्‍तम आकडे समोर आले. ऑक्टोबरमध्ये कोअर सेक्टरमध्ये १२.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कोळशाच्या उत्पादनात १८.४%, स्टीलमध्ये ११%, सिमेंटमध्ये १७.१%, खताच्या उत्पादनात ५.३% वाढ झाली आहे. ४. नोव्‍हेंबरमध्‍ये उत्‍कृष्‍ट GST कलेक्‍शन : मोदी सरकारला GST कलेक्‍शन आघाडीमध्ये मोठं यश मिळालं आहे. नोव्‍हेंबर २०२३ मध्‍ये एकूण GST कलेक्‍शन १,६७,९२९ लाख कोटी रुपये झाला आहे. ज्यात १५ टक्‍क्‍यांनी विक्रमी वाढ नोंदवली आहे. ५. विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी शुभ संकेत : ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक मोदी सरकारसाठी महत्त्वाची आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असली तरी त्याआधीच सर्व एक्झिट पोल भाजपसाठी चांगले संकेत देत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BvaC9iL

No comments:

Post a Comment