नाशिक/ नागपूर : यांनी केलेल्या आरोपावर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी प्रकाश सोळंकेंचा संदर्भ देत जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचे होते, मी बीड जिल्ह्यातून वरिष्ठ आहे. मला मंत्री करा ही त्यांची अपेक्षा होती. माझ्या सोबत त्यांची चर्चा सुरू होती, तेव्हा अजितदादा आले, मला न विचारता त्यांनी कार्याध्यक्ष बनविण्याचे आश्वासन दिले,माझा त्यात काही रोल नव्हता, असं जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर पक्षाने कधी मला अध्यक्ष पद सोडा,त्यांना अध्यक्ष करायचे आहे असे सांगितले नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचे होते. त्यांच्यावरील जो अन्याय झाला होता तो दूर करण्याची मोठी संधी अजितदादा यांना होती. त्यांनी नवं मंत्रिमंडळ करताना त्यांना संधी द्यायला हरकत नव्हती, असं जयंत पाटील म्हणाले. अजित पवार चुकीचा आरोप करत आहेत, मी मुद्दाम काही बोलत नाही. त्यांनी चुकीचे आरोप करू नये. जे पवार साहेबांनी प्रत्यक्ष केले ते सर्व जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कोणी कोणाशी काय चर्चा केली ते चार महिन्यांनी सांगत असतील त्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.पूर्वी पवार साहेबांशी काय चर्चा केली त्यांना दोघांना माहीती आहे, तो त्या दोघांचा प्रश्न आहे. आम्हला खाजगीमध्ये जी भूमिका सांगितली आहे त्या प्रमाण काम करत आहोत. अजित पवार गटाची त्यांची वेगळी चूल आहे, ते त्याचे उमेदवार ऊभे करणार त्यात तक्रार करण्याचे कारण नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. अजितदादा यांनी पवार साहेबांशी जी चर्चा झाली ती आम्हला वेळोवेळी सांगितले असते तर हे अंतर आम्ही पडू दिले नसते, असंही जयंत पाटील म्हणाले. कोणतीही बैठक झाली मला माहीत नाही,मी कोणत्याही व्यावसायिकच्या घरी बैठकीत उपस्थित नव्हतो. माझ्या घरी कुठलीच मिटींग झाली नाही, असंही ते म्हणाले.
अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर
तुम्हाला जे खाते पाहिजे ते आम्ही देतो पण तुम्ही आमच्या सोबत या अशी ऑफर मला होती. परंतु ८३ वर्षाच्या बापाला सोडून मी कधीच येणार नाही असे मी ठाम पणे सांगीतले होते असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री यांनी अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिले.अजित पवार यांनी सांगितल्या प्रमाणे मी अनेक बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत उपस्थित होतो. पण त्या बैठकीत यावर चर्चा होताना मी नेहमीच सांगत होतो की, साहेबांना या वयात आपण असे चुकीचे निर्णय घेवून त्रास देवून नका. ज्या दिवशी हा शपथविधी होता त्या दिवशी मी पुण्याला होतो. मला अनेक फोन येत होते की मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तुम्ही या. पण ज्या पक्षाने खोट्या आरोपाखाली मला त्रास दिला त्या भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. अजितदादा आज जे काही सांगत त्यांना हे सांगण्यासाठी ६ महिने का लागले ? असा प्रश्न सुध्दा अनिल देशमुख यांनी उपस्थित करीत अजित पवार यांनी कर्जत येथे जे काही वक्तव्य केले ते चुकीचे असल्याचे म्हटलं. Read Latest Andfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EUyNBtQ
No comments:
Post a Comment