म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या जनतेचे आभार मानताना ‘जनता जनार्दनाला नमन!’ अशी प्रतिक्रिया दिली व आम्हाला भारताला विजयी करायचे आहे, असा आशावाद जागविला.पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे, की निवडणूक निकाल हे दर्शवत आहेत की भारतातील जनतेचा विश्वास फक्त सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे. मी या सर्व राज्यातील कुटुंबातील सदस्यांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे, भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक काम करत राहू. यानिमित्ताने पक्षाच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण सादर केले आहे. तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलीत त्याची प्रशंसा करता येणार नाही. आता आम्ही विकसित भारताचे ध्येय घेऊन पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाही आणि खचून जायचे नाही. आपल्याला भारताला विजयी करायचे आहे. आज आपण एकत्रितपणे या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे. भाजप मुख्यालयात मोदी म्हणाले...- या निवडणुकीत देशाला जातींमध्ये वाटण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण मी सतत म्हणत होतो की महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार जातींना सशक्त करूनच देश मजबूत होणार आहे.- मी कधीही भविष्यवाणी केली नाही; पण या वेळी माझाच नियम मोडून मी राजस्थानबाबत भाकीत केले होते की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार परत येणार नाही.- देशातील नारी शक्ती भाजपचा झेंडा फडकविण्याच्या निर्धाराने बाहेर पडली आहे.- देशातील शेतकरी, आदिवासी व वंचित, महिला असो की पहिल्यांदाच मतदान करणारे युवक, साऱ्यांच्या मनात आज आपणच विजयी झालो ही भावना.- २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र म्हणून पाहू इच्छिणारा प्रत्येक नागरिक याला आपलेच यश मानत आहे.- राजस्थान, छत्तीसगड किंवा तेलंगण असो, सरकारांनी तरुणांच्या विरोधात काम केले, तेथे त्यांना सत्तेबाहेर फेकून दिले गेले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BwNLZu8
No comments:
Post a Comment