सेंच्युरियन : कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पिछाडीवर पडलेला आहे. पण तरीही भारतीय संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दमदार कमबॅक करू शकतो. भारताला जर या सामन्यात कमबॅक करायचे असेल तर त्यांना फक्त एकच गोष्ट करावी लागणार आहे.भारताच्या सामन्याचा दुसऱ्या दिवशी सामन्यात कमबॅक करण्याची सुवर्णसंधी आली होती. पण ही संधी भारताने गमावली. लंचनंतर भारताने दोन विकेट्स झटपट मिळवल्या असत्या तरी एवढी धावसंख्या दक्षिण आफ्रिकेची होऊ शकली नसती. त्याचबरोबर जसप्रीत बुमराने जेव्हा दोन षटकांत दोन विकेट्स मिळवल्या तेव्हाही भारताला सामन्यात कमबॅक करण्याची संधी होती. पण दुसऱ्या दिवशी भारताला अपेक्षेनुरुप चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या दिवशी आघाडी मिळवता आली आहे. पण दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेतली असली तरी त्यांना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला कमबॅक करण्याची नामी संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेकडे ११ धावांची आघाडी आहे. ही काही जास्त धावांची आघाडी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या मार्गात एकच अडसर आहे आणि डीन एल्गर. कारण एल्गरने शतक झळकावले आहे आणि तो द्विशतकाच्या दिशेने कूच करत आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात कमबॅक करायचे असेल तर त्यांना फक्त एकच गोष्ट करावी लागणार आहे. भारताने जर डीन एल्गरने लवकरात लवकर बाद केले तर त्यांना या सामन्यात कमबॅक करण्याची सुवर्णसंधी आहे. कारण एल्गर बाद झाला तर दक्षिण आफ्रिकेकडे दुसरा दिग्गज फलंदाज नाही आणि त्यांच्याकडे मोठी आघडीही नाही. त्यामुळे भारताने जर एल्गरला लवकर बाद केले तर त्यांना सामन्यात दणक्यात पुनरागमन करता येऊ शकते. त्यासाठी एल्गरला झटपट बाद करण्याची रणनिती भारताला आखावी लागेल.डीन एल्गरने आजचा दिवस गाजवला आणि आपल्या शतकासह संघाला ११ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा एल्गर हा २३ चौकारांसह १४० धावांवर खेळत होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VNsfvbE
No comments:
Post a Comment