Breaking

Friday, December 15, 2023

धक्कादायक! पत्नी व्हॉट्सअपवर बोलत होती; पतीला राग अनावर, संतापात नको ते करून बसला अन्... https://ift.tt/J2jr6EM

पिंपरी: सोशल मीडियामुळे जग जवळ आले असे आपण म्हणतो. पण त्याचे दुष्परिणाम देखील तेवढेच आहेत. सोशल मीडियावरून पती पत्नीमध्ये भांडणे होताना देखील आपण अनेकदा पहिली आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आली आहे. आपली पत्नी सतत व्हॉट्सअपवर का बोलते या गोष्टीचा मनात राग धरून पतीने दारूच्या नशेत पतीने पत्नीला गळफास देऊन जीव मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सांगावी पोलीस ठाण्यात पती आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती विकी रमेश सोनवणे आणि सासरा रमेश तुकाराम सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील मिलिटरी स्टेशन येथे रविवारी रात्री ते १३ डिसेंबर या दरम्यान घडला आहे. याबाबत संबधित महिलेने फिर्याद दिली आहे. विकी याची पत्नी सतत सोशल मीडियावर व्हॉट्स अपवर चॅटिंग करत होती. त्याचा राग पतीच्या मनात होता. त्या रागाच्या भरात पती विकी याने पत्नीच्या गळ्यात दोरीचा फास लावला. त्यानंतर पत्नीला सीलिंग फॅनला दोरी लावून खुर्चीवर उभे केले. पत्नी उभी राहिल्यानंतर पतीने खुर्ची खाली ढकलून देत तिला गळफास देण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे तिच्या मदतीला आले. याबाबत सासऱ्यांना सर्व माहीत असताना देखील त्यांनी सुनेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. विकी हा अनेकदा तिला दारू पिऊन मारहाण करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. विकी हा आर्मीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घटनेनंतर सांगवी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल केला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gIFqL8C

No comments:

Post a Comment