Breaking

Friday, December 15, 2023

'म्हाडा'वासीयांसाठी गुड न्यूज! वाढीव सेवाशुल्क माफ, ५६ वसाहतींमधील लाखो राहिवाशांना दिलासा https://ift.tt/qEBDOQu

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे ३८०.४१ कोटींचे वाढीव सेवाशुल्क माफ होणार असून, मुंबईतील ५० हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.म्हाडाच्या ५६ वसाहतींना सन १९९८पासून वाढीव सेवाशुल्काचे दर लागू करण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. सेवाशुल्कामध्ये वाढ करण्यासंबंधी अभ्यासगटही नियुक्त करण्यात आला होता. मुंबईतील वसाहतींतील रहिवाशांकडून जे सेवाशुल्क घेतले जाते त्यातील म्हाडामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांच्या शुल्काचे दर ५० टक्क्यांनी कमी करण्यात यावेत, अशी शिफारस या अभ्यासगटाने केली होती. त्यानुसार म्हाडाने त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्काचे दर ५० टक्क्यांनी कमी केले होते. मात्र, मुंबई महानगरपालिका, बेस्ट यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या सेवांचे शुल्क कमी केले नव्हते. त्यामुळे म्हाडाला सन १९९८ ते २०२१ या कालावधीमध्ये ४७२ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली होती.सेवाशुल्क वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा बोजा सहन करावा लागत होता. त्यामुळे म्हाडाच्या ५६ वसाहतींचे सन १९९८ ते २०२१ या कालावधीमधील वाढीव सेवाशुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी १४ मे, २०२३ रोजी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेमध्ये केली होती. सेवाशुल्क माफ करण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अजय चौधरी, सुनील प्रभू आणि मुंबईतील इतर आमदारांनी सतत पाठपुरावा केला. त्यांची मागणी या निर्णयामुळे पूर्ण झाली आहे.अभय योजनेकडे रहिवाशांची पाठम्हाडाने सन १९९८ ते २०२१ या कालावधीच्या सुधारित सेवाशुल्काबाबत अभय योजना लागू केली होती. या अभय योजनेला रहिवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.Read And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JK3duoC

No comments:

Post a Comment