Breaking

Monday, December 18, 2023

महिला घरमालकाच्या भाच्याला सोडायला निघाली; टवाळखोर दुचाकीस्वारांनी मारला कट अन् सगळंच संपलं https://ift.tt/LMQWI2V

लातूर: घरमालकाच्या भाच्याला दुचाकीवरून स्कूल बसला सोडायला निघालेल्या बंगाली महिलेचा ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. मोसमी देबनाथ (२२) असे मयत महिलेचे नाव आहे. लातूर शहरातील डालडा फॅक्टरीजवळ मजीद अल्लाउद्दीन चौधरी यांच्या घरी वास्तव्यास असलेली मोसमी तिच्या घरमालकाच्या भाच्याला शाळेसाठी स्कूल बसला सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाली. मात्र शहरातील सम्राट चौकात येताच दुचाकीवरून आलेल्या टवाळखोर पोरांनी तिच्या गाडीला कट मारला. यात तिच्या गाडीला धक्का लागला अन् त्याचवेळी गुळमार्केटकडून भरधाव वेगात खासगी ट्रॅव्हल्स आली. त्यामुळे दुचाकीची आणि या ट्रॅव्हल्सची जोराची धडक बसली. या भीषण अपघातात मोसमी देबनाथ ट्रॅव्हल्सखाली आली. तर तिच्या गाडीवरील घरमालकाचा भाचा अहेसान कदीर बागबान बाजूला फेकला गेला. हा अपघात लक्षात येताच ट्रॅव्हल्स चालकाने मात्र घटना स्थळावरून पळ काढला. कट मारणारी पोरं तर केव्हाच पसार झाली होती. हा अपघात घडल्यानंतर लगेच नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी गांधी चौक पोलीस तात्काळ दाखल झाले. बेशुद्ध पडलेल्या मोसमीला आणि किरकोळ जखमी झालेल्या अहेसानला तात्काळ स्व. विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी मोसमीला तपासून मयत घोषित केले. मयत मोसमीचा पती सोन्याच्या दुकानात कारागीर म्हणून काम करतो. तर मयत मोसमी खानावळ चालवत होती. तिला एक लहान मुलगा आहे. या घटनेने लातूर शहरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9ZFa5cL

No comments:

Post a Comment