Breaking

Sunday, December 24, 2023

लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, शंभर रुपयांपासून लाखो रुपयांची मागणी, सर्वसामान्य नागरिकांची लूट https://ift.tt/O1y3J9r

म. टा. प्रतिनिधी, : वैध आणि शासकीय कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून लाच घेऊन काम करणाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात १२५ सापळे रचून लाचलुचपत विभागाने एकूण १६८ लोकसेवक; तसेच खासगी व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. छत्रपती संभाजीनगर अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव या चार जिल्ह्यांत वर्षभरात या कर्मचाऱ्यांनी ४८ लाख ९४ हजार ७३० रुपयांची लाच स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात झालेल्या एकूण कारवाईमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात यशस्वी सापळ्याबाबत नाशिक आणि पुणे नंतर तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहितीही समोर आली आहे.लाच लुचपत विभागाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरात एकूण ७७४ सापळे रचण्यात आले आहेत. यात एक हजार ८३ लोकसेवकांसह अन्य खासगी व्यक्तींवर लाच प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यभरात चार कोटी ५३ लाख ३६ हजार २५५ रुपयांची लाच संबंधित लोकसेवकांकडून मागण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभागासाठी १९२ सापळे रचण्यात आलेले असून, यात २५६ अधिकारी कर्मचारी व इतर व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. राज्यात पोलिस विभाग हा भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकवर आहे. राज्यभरात १३९ सापळ्यांमध्ये १९२ पोलिस अधिकारी व कर्मचारी अडकले आहेत. पंचायत समितीत एकूण ७८ छाप्यांमध्ये ११५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेत ४१ सापळ्यामध्ये ५६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, 'महावितरण'मध्ये ४५ सापळ्यांमध्ये एकूण ६१ जणांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात झालेल्या कारवाईमध्ये महसूल विभागाचे २२, पोलिस विभागाचे २४, पंचायत समितीचे १२ यासह महापालिका, 'महावितरण'चे कर्मचारी अधिकाऱ्यांकडून लाचेचे प्रकरण समोर आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात १६८ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षी ११३ सापळे यशस्वी झाले होते. यंदा सापळ्यांची संख्या १२ ने जास्त असल्याची माहितीही समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत धाराशीवची यंदाची कारवाई चांगली राहिल्याचीही माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा आठ सापळे अधिक धाराशीव विभागाने यशस्वी केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाने गेल्या वर्षीचा ४६ कारवाईचा आकडा यंदाही कायम ठेवला आहे.अशी आहे कारवाईची आकडेवारीछत्रपती संभाजीनगर - ४६जालना - २७बीड - २६धाराशीव - २६राज्यभरातील आकडेवारीपरिक्षेत्र सापळा आरोपीमुंबई ३५ ४५ठाणे १०१ १४१पुणे १४१ १९७नाशिक १५८ २२९नागपूर ७४ ११३अमरावती ८३ ११५छत्रपती संभाजीनगर १२५ १६८नांदेड ५७ ७३२०० ते १३ लाख पर्यंत मागितली लाचछत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या वर्षभरात झालेल्या कारवाईत नवीन रेशन कार्ड देण्यासाठी २०० रूपयांची लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. याशिवाय धाराशिव येथे एका जिल्हा परिषदेच्या शिक्षीकेला तिच्या प्रस्तावात त्रुटी राहु नये. यासाठी ३०० रूपयांची लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर जलसंधारण विभागात कामाचे देयके काढण्यासाठी साडे आठ लाखांची लाच घेतली. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसात एका उपनिरिक्षकाने एक लाखांची लाच घेतली असून बीड मध्ये एका प्रकरणात पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्याने ३ लाखांची लाच मागीतल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांनी वीज मीटर बसवून देणे किंवा अन्य कामांसाठी लाचेची मागणी केली. छत्रपती संभाजीनगर नोंदणी विभागातील एका अधिकाऱ्याने विकासकाकडून एक लाख लाच मागितली होती. संस्थेत मुलीला नौकरी लावून देतो. असे सांगून तेरा लाख रूपयांची लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ziaGjIJ

No comments:

Post a Comment