केप टाऊन : भारतीय संघाला युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार हा भारतीय संघासह दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला आहे. पण मुकेश कुमारबरोबर एक सुंदरी फिरत असल्याचे पाहायला मिळाले. मुकेश आणि या सुंदरीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. सुरुवातीला ही सुंदरी आहे तरी कोण ते समजलं नव्हतं, पण आता ही ललना नेमकी आहे तरी कोण, याची माहिती समोर आली आहे.मुकेश कुमार जेव्हा दक्षिण आफ्रिकेत उतरला तेव्हा त्याच्याबरोबर ही सुंदरी असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ विमानतळावर जेव्हा उतरला तेव्हा बऱ्याच जणांनी भारतीय खेळाडूंचे फोटो काढले. त्यावेळी मुकेशबरोबर ही सुंदरी असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतही मुकेश या सुंदरीबरोबर बऱ्याचदा पाहायला मिळाला. त्यामुळे मुकेशबरोबर असणारी ही सुंदरी आहे तरी कोण, याची चर्चा जोरात सुरु झाली. सुरुवातीला ही सुंदरी आहे तरी कोण, हे समजत नव्हते. पण काही वेळाने या सुंदरीचे नावही समोर आले आहे. या सुंदरीचे नाव आहे दिव्या. आता ही दिव्या मुकेश कुमारबरोबर दक्षिण आफ्रिकेत काय करते, हा प्रश्न चाहत्यांना पडला असेल, तर ही दिव्या मुकेश कुमारची पत्नी आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यासाठी खेळायला जाताना तो दिव्याला सोबत घेऊन गेला नव्हता. पण दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर मात्र मुकेश आपली पत्नी दिव्याला घेऊन आला आहे आणि या दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.मुकेश कुमार हा बिहारच्या गोपालगंज नावाच्या गावात राहत होता. तिथेच त्याने क्रिकेटला सुरुवात केली. पण तो तिथे जास्त रमला नाही. तो तिथून पश्चिम बंगालला गेला आणि त्याच्या खेळात मोठा बदल झाला. त्यानंतर रणजी, दुपील अशा स्पर्धा खेळत त्याची आयपीएलमध्ये एंट्री झाली. दिल्ली कॅपिटल्सकडून तो खेळत राहीला. मुकेशची कामगिरी चांगली होत राहिली आणि त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले झाले. आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तो भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघांत खेळणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xCTH3Wp
No comments:
Post a Comment