मुंबई : अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रविवारी मध्यरात्री १.१० ते सोमवार पहाटे ४.४०पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. अप-डाऊन हार्बरसह अप-डाऊन धीमा-जलद मार्ग आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या आठ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे.रविवारी रद्द होणाऱ्या फेऱ्या- विरार-अंधेरी : रात्री १०.१८- वसई रोड-अंधेरी : रात्री ११.१५- चर्चगेट-विलेपार्ले : मध्यरात्री १२.३०सोमवारी या फेऱ्या रद्द- अंधेरी-विरार : पहाटे ४.२५- वांद्रे-बोरिवली : पहाटे ४.०५- बोरिवली-चर्चगेट : पहाटे ४.५३- अंधेरी-विरार : पहाटे ४.४०- अंधेरी-चर्चगेट : पहाटे ४.०५या लोकलना सोमवारी विलंब- विरार-चर्चगेट : पहाटे ३.२५ (१० मिनिटे)- बोरिवली-चर्चगेट : पहाटे ४.०५ (१५ मिनिटे)- विरार-बोरिवली : पहाटे ३.३५ (१० मिनिटे)
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9L74oe3
No comments:
Post a Comment