पुणे : नगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.डिंगोरे येथील अपघाताची ही माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांकडूनस्थानिकांसह मदत कार्य चालू असल्याचे पुढे आले आहे. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत असून अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओतूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहेत.मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती,पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश. या अपघातातील मृतांची एकूण ची संख्या आठ आहे. यात पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे ( वय ३०), कोमल मस्करे ( वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नसून या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान,प्राथमिक माहितीनुसार हा अपघात साडे दहानंतर आणि अकराच्या दरम्यान घडली आहे. रविवार हा अपघातवार ठरलारविवारी सकाळी नागपूरमधील सोलार कंपनीत स्फोटकांचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पुणे नाशिक महामार्गावर देखील अपघात होऊन कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आता, पुणे जिल्ह्यात देखील नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक कुटुंब संपलं आहे.Read Latest And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UykMPDF
No comments:
Post a Comment