Breaking

Wednesday, January 31, 2024

Ganesh Marne: शरद मोहोळ हत्याकांड: मास्टरमाइंड गणेश मारणेसह तिघांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई https://ift.tt/dy7XVJo

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. मोहोळच्या खुनानंतर प्रसार झालेल्या मारणेला बुधवारी सायंकाळी संगमनेर परिसरातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. शरद मोहोळवर ५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात अन्य मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली होती. मोहोळवर गोळ्या झाडल्यावर हल्लेखोरांनी 'आम्ही गणेश मारणे टोळीतील आहोत,' असा आरडाओरडा केला होता, असे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातही विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांनी कट रचून मोहोळचा खून केल्याचे समोर आले होते. त्यामुळे मारणे पसार झाला होता. पोलिसांची विविध पथके राज्यभरात त्याचा शोध घेत होती.दरम्यान, मारणे याने या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मारणे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकार पक्षाला बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. याशिवाय मारणे आणि शेलारसह सर्व आरोपींवर नुकताच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मारणेसह तिघे ताब्यातगणेश मारणे पसार झाल्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होते. संगमनेर परिसरातून बुधवारी सायंकाळी मारणेसह तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5yrNjH9

No comments:

Post a Comment