Breaking

Wednesday, January 31, 2024

दुसऱ्या कसोटीपूर्वी अश्विनसाठी आली गुड न्यूज, पाहा नेमकं घडलं तरी काय... https://ift.tt/5qiWgdn

दुबई : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा अनुभवी गोलंदाज आर. अश्विनसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. अश्विन हा चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे या गुड न्यूजमुळे अश्विनचे दुसऱ्या कसोटीसाठी मनोबल नक्कीच उंचावलेले असेल.आर.अश्विनने आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीने बुधवारी नवीन क्रमवारी जाहीर केली.भारताला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला असला, तरी या कसोटीत अश्विनने सहा विकेट मिळवल्या. यामुळे त्याचे गुण ८५३ झाले. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सची एका क्रमांकाने घसरण झाली. तो ८२८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला, तर दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा ८५१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतर भारतीयांमध्ये महंमद सिराज १९व्या, तर महंमद शमी २०व्या क्रमांकावर आहे. अक्षर पटेल ३१व्या क्रमांकावर आहे.फलंदाजीत फायदा नाहीकसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये इंग्लंडविरुद्ध न खेळलेल्या विराट कोहलीला एका क्रमाकाने फायदा झाला आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल क्रमांकावर आहे. कोहली सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून, रोहित शर्माची एका क्रमाकाने घसरण झाली आहे. तो बाराव्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजा ३९व्या क्रमांकावर आहे.अष्टपैलूंमध्ये जाडेजा अव्वलभारताचा रवींद्र जडेजा ४२५ गुणांसह अव्वल क्रमांकावर असून, अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अक्षर पटेलची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचे जो रूट चौथ्या, तर बेन स्टोक्स पाचव्या क्रमांकावर आहे.कसोटी क्रमवारीतील अव्वल दहा गोलंदाज१. आर. अश्विन (भारत) - ८५३२. कॅगिसो रबाडा (द. आफ्रिका) - ८५१३. पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) - ८२८४. जसप्रीत बुमराह (भारत) - ८२५५. जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) - ८१८६. रवींद्र जाडेजा (भारत) - ७५४६. ओली रॉबिनसन (इंग्लंड) - ७५४८. जेम्स अँडरसन (इंग्लंड) - ७५३९. प्रबाथ जयसूर्या (श्रीलंका) - ७५१ १०. नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) - ७४६.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W7AS1Gn

No comments:

Post a Comment