Breaking

Monday, January 1, 2024

GST Collection Update: नवीन वर्षात चांगली बातमी! सरकारी तिजोरीत आला १२ टक्के अधिक पैसा; वाचा सविस्तर https://ift.tt/05cpiE8

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात डिसेंबर महिन्यात डिसेंबर २०२२मधील जीएसटी संकलनाच्या तुलनेत १० टक्के वाढ झाली. डिसेंबर २०२३मध्ये १.६४ लाख कोटी रुपयांचा जीएसटी संकलित झाला.चालू आर्थिक वर्षाच्या (२०२३-२४) एप्रिल ते डिसेंबर २०२३ या काळात जीएसटी संकलनात ढोबळ १२ टक्के वाढ दिसून आली आहे. मागील आर्थिक वर्षात याच काळात १३.४० लाख कोटी रुपये जीएसटी गोळा झाला होता. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर २०२३ या काळात १४.९७ लाख कोटी रुपये जीएसटी गोळा झाला आहे. ही माहिती सोमवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली.डिसेंबर २०२३मधील पाहता, सलग सातव्या महिन्यात जीएसटी १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक संकलित झाला आहे. केंद्र सरकारने सीजीएसटी म्हणून ४०,०५७ कोटी रुपये बाजूला काढले आहेत. ३३,६५२ कोटी रुपये एसजीएसटीच्या रूपात बाजूला ठेवण्यात आले आहेत. यामुळे केंद्र व राज्य यांचा डिसेंबर २०२३मधील करमहसूल सीजीएसटी ७०,५०१ कोटी रुपये आणि एसजीएसटी ७१,५८७ कोटी रुपये झाला आहे.जीएसटीचे संकलन- एकूण जीएसटी : १,६४,८८२ कोटी रुपये- सेंट्रल जीएसटी : ३०,४४३ कोटी रुपये- स्टेट जीएसटी : ३७,९३५ कोटी रुपये- आयजीएसटी : ८४,२५५ कोट रुपये (यामध्ये आयात वस्तूंवरील ४१,५३४ कोटी रुपये कराचा समावेश)- उपकर : १२,२४९ कोटी रुपये (यामध्ये आयात वस्तूंवरील १,०७९ कोटी उपकराचा समावेश)दहाव्या महिन्यात १.५ लाख कोटीअर्थ मंत्रालयाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली आणि सलग दहाव्या महिन्यात मासिक जीएसटी संकलन १.५ लाख कोटींच्या वर राहिले आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये होते. मंत्रालयाने निवेदनात म्हटले की, एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत एकूण जीएसटी संकलन १२% वाढीसह १४.९७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या नऊ महिन्यांत १३.४० लाख कोटी रुपये कर संकलन झाले होते.संकलन वेगाने वाढलेविशेष म्हणजे डिसेंबर हा या वर्षाचा सातवा महिना आहे ज्यामध्ये १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी कलेक्शन झाले आहे. गेल्या काही वर्षांत मासिक जीएसटी संकलन वाढले आहे. २०१७-१८ मध्ये हे दरमहा सरासरी एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होते. २०२०-२१ च्या साथीच्या रोगानंतर २०२२-२३ मध्ये जीएसटी संकलन वेगाने वाढून सरासरी १.५१ लाख कोटी रुपये झाले.महाराष्ट्र अव्वलडिसेंबर २०२३ मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप तीन राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील जीएसटी संकलन १४% वाढून २३,५९८ कोटी रुपये झाले आहे. या यादीत १०,०६१ कोटींसह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे आणि गुजरात ९,२३८ कोटींसह तिसऱ्या स्थानावर आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/E6ieFqh

No comments:

Post a Comment