सोलापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार शनिवारी दिवसभर सोलापुरात होते. हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रकाश यलगुलवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर किर्लोस्कर सभागृहात पुस्तक प्रकाशनाचा उद्घाटन सोहळा शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती येथे महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाच्या महिला अध्यक्षा सुनीता रोटे या अत्यंत सध्या घरात वास्तव्यास आहेत. शरद पवारांसाठी दुपारच्या वेळेस जेवणाची व्यवस्था सुनीता रोटे यांच्या घरी करण्यात आली होती. शरद पवार यांनी सुनीता रोटे, दादाराव रोटे आणि अरुण रोटे यांच्या पत्र्याच्या खोलीत बसून दुपारचे जेवण केले. यामुळे शरद पवारांचा साधेपणा दिसून आला. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पत्र्याच्या खोलीत बसून शरद पवारांनी जेवण केल्याने अख्ख्या रोटे कुटुंबाचा कंठ दाटून आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार दोन दिवसांच्या भेटीसाठी सोलापुरात आले होते. शुक्रवारी दिवसभर पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा येथे विविध कार्यक्रमांत शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शुक्रवारी आणि शनिवारी सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांचे भरगच्च कार्यक्रम झाले. शनिवारी दुपारी सोलापूर शहरात जेवणासाठी शरद पवार एका सामान्य महिला कार्यकर्त्याच्या घरी गेले. पत्र्याचे शेडवजा छोट्या बैठ्या घरात पवार यांनी जेवण केले. आपला पाहुणचार स्वीकारल्याबद्दल संबंधित महिला कार्यकर्ती सुनीता रोटे आणि त्यांचा परिवार अक्षरशः भारावून गेले होते. सुनीता रोटे सोलापूर शहर शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्ष आहेत. सुनीता रोटे यापूर्वी महापालिकेवर राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. अलिकडे पक्षाच्या शहराध्यक्षा झाल्या तरी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची. दगड-विटांच्या भिंती, पन्हाळी पत्र्यांचे छप्पर असलेल्या छोट्याशा झोपडीवजा घरात रोटे परिवार वास्तव करत आहे. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे अशा ठराविक स्थानिक नेत्यांनी पवार यांच्याबरोबर सुनीता रोटे यांच्या घरी जेवण केले. सुनीता रोटे आणि त्यांचे कुटुंबीयांच्या घरी यानिमित्ताने दिवाळीसारखा आनंद झाला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jT8l6Rn
No comments:
Post a Comment