Breaking

Friday, January 5, 2024

भारतीय नौदलाच्या धाडसापुढे समुद्री लुटारुंचा पराभव; एमव्ही लिला नॉरफोक जहाजाची सुटका, १५ भारतीयांना जीवनदान https://ift.tt/gEZtq9c

भारतीय नौदलाने सोमालियाजवळ समुद्री चाच्यांच्या तावडीत अडकलेल्या एमव्ही लीला नॉरफोक जहाजावरील १५ भारतीय क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. भारतीय नौदल १५ जीव वाचवण्यासाठी आयएनएस चेन्नई युद्धनौका घेऊन आले होते. दीर्घकाळ चाललेल्या या ऑपरेशननंतर एमव्ही लीला नॉरफोक जहाजावरील १५ भारतीय सुरक्षित आहेत. लष्करी अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपहरण झालेल्या जहाजावर एकूण २१ क्रू मेंबर्स होते. सर्वांची सुटका करण्यात यश आले आहे. एडनच्या आखातात सोमालियापासून ३०० सागरी मैल अंतरावर ही घटना घडली. लिबेरिया देशाच्या ‘एमव्ही लिला नोरफोक’ या जहाजाने पाच ते सहा सशस्त्र व्यक्ती जहाजावर चढल्याचा संदेश युकेच्या समुद्री व्यापार केंद्राला पाठवला. हाच संदेश भारतील नौदलालादेखील मिळाला. त्याबरोबर नौदलाने टेहळणी विमान त्या जहाजाकडे रवाना केले. त्याचवेळी समुद्री चाच्याविरुद्धच्या मोहिमेवर शस्त्रसज्ज होऊन गस्त घालणाऱ्या ‘आयएनएस चेन्नई’ या युद्धनौकेलादेखील त्या जहाजाकडे वळविण्यात आले. या युद्धनौकेने जहाजाला सुरक्षित केले. लष्करी अधिकारी म्हणाले की, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0T4vkxU

No comments:

Post a Comment