यवतमाळ: भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाने ऑटो आणि दुचाकीला धडक दिली. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता दिग्रसजवळ झालेल्या या अपघातात नऊ जण जखमी झाले. आमदार भोंडेकर हे दिग्रसला स्वीय सहाय्यकाच्या घरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. कार्यक्रमानंतर परत भंडाऱ्याला जात असताना त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनावर बैलगाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ऑटो धडकला. नंतर समोरून येणारी दुचाकीही धडकली. या अपघातात दुचाकीवरील गजानन जकाते (५०) रा. दिग्रस, उमेश राजू मनवर (वय ३०) रा. चिंचोली हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालय यवतमाळला हलविण्यात आले आहे. ऑटोमधील जखमींमध्ये सै.जावेद सै. ताजुद्दीन (३८), सलमा परवीन (२४), अफसाना बी. मो. जमीर (६०), प्रतिक ब्रम्हा मोरे (२०), सुरेखा गजानन बोरकर (३०), अनस खान वाजीद खान (१२), तोहीद खान वाजीद खान (८) सर्व रा. दिग्रस यांचा समावेश आहे. या सर्वांना दिग्रसच्या रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर रात्री उशिरा यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती दिग्रस पोलिसांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Sfu4RpH
No comments:
Post a Comment