तेहरान: इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यांची माहिती इराणच्या सरकारी वृत्त संस्था आयआरएनएने दिली आहे. त्यानंतर संबंधित वृत्त कोणतेही कारण न देता हटवण्यात आले. IRNA वृत्त संस्था आणि वृत्तवाहिनीने म्हटले होते की, हल्ल्यात मिसाइल आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता. अशा प्रकारचे हल्ले करण्यात आल्याचे पाकिस्तानने स्विकारले नव्हते. हे हल्ले पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या विरुद्ध करण्यात आले. जैश अल-अलद ही पाकिस्तानमधील एक सुन्नी दहशतवादी संघटना आहे.या संघटनेने काही महिन्यांपासून इराणच्या सीमाभागात दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर इराणने पाकिस्तानला बजावले देखील होते. इराणकडून झालेली कारवाई अशा वेळी झाली आहे जेव्हा या परिसरात आधीपासून तणावाचे वातावरण आहे. गाझा येथे इस्रायलआणि हमास यांच्या युद्ध सुरू आहे आणि ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. करण्याआधी इराणने सोमवारी इराकमधील अर्ध स्वायत्त कुर्द प्रांतातील इरबिल शहरावर मिसाइल हल्ले केले होते. हे हल्ले इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या ठिकाणांवर करण्यात आल्याचा दावा इराणने केला होता. इराकने हे दावे फेटाळून लावले. गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानमधील एका पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. ज्यात १४ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणने पाकिस्तानला सीमा भागातील दहशतवाद्यांना नियंत्रणात ठेवण्याची धमकी दिली होती. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी पाकिस्तानला सांगितले होते की, इराणला सोडून असलेल्या सीमेचे पाकिस्तानने संरक्षण करावे आणि दहशतवादी संघटनांकडून आमच्या क्षेत्रात होणारे हल्ले रोखावेत. पाकिस्तानच्या भूमीवरून आमच्या क्षेत्रात वारंवार हल्ले होत आहेत. आशा आहे की या गोष्टी बंद करेल. पाकिस्तानने फक्त सीमा भागात नाही तर संपूर्ण देशात दहशतवाद्यांना नियंत्रणात ठेवले पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे हल्ले होणार नाहीत. इराणचे गृहमंत्रीच नाही तर विदेश धोरण समितीचे सदस्य फिदा हुसैन मालिकी यांनी देखील पाकिस्तानला धमकी दिली होती. सिस्तान-बलुचिस्तानची जबाबदारी पाकिस्तानची आहे. आम्ही या घटनेनंतर पाकिस्तानकडे एका गुन्हेगाराप्रमाणे पाहतोय. कारण या संघटना पाकिस्तानच्या भूमीवर आहेत. पाकिस्तानने त्यांना तातडीने थांबवले पाहिजे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/XnqEGDQ
No comments:
Post a Comment