Breaking

Tuesday, January 16, 2024

भारतीय संघाच्या सरावात ऋषभ पंतची एंट्री, सराव करतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल.... https://ift.tt/HVQrfm9

बंगळुरु : भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्याचा सराव करत असताना चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. कारण भारताच्या सरावात यावेळी भारताचा युवा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत पाहायला मिळाला. यावेळी ऋषभ पंतचा विराट कोहलीबरोबरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये ऋषभ आणि विराट यांच्याबरोबर रिंकू सिंगही पाहायला मिळत आहे.ऋषभचा डिसेंबर २०२२ मध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातामधून ऋषभ बचावला. पण त्यावेळी त्याची प्रकृती चांगली नव्हती. पण गेल्या दीड वर्षांत ऋषभच्या प्रकृतीमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. सध्याच्या घडीला ऋषभ हा येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्याचबरोबर त्याचा सरावही येथे सुरु झाला आहे. भारताचा तिसरा टी-२० सामना हा बंगळुरु येथेच होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ जेव्हा सरावासाठी मैदानात उतरला तेव्हा ऋषभही तिथे पोहोचल्याचे पाहायला मिळाले. ऋषभने यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माबरोबर काही काळ चर्चा केली. त्यानंतर ऋषभ विराट कोहली आणि रिंकू सिंग यांच्याबरोबर काही वेळ चर्चा करत होता. या तिघांचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.ऋषभच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असली तरी तो अजून सामना खेळण्यासाटी फिट नसल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी तो आयपीएलच्या दुबई येथे झालेल्या लिवातही पाहायला मिळाला होता. त्यानंतर तो आता बंगळुरुत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर मेहनत घेत आहे. काही दिवसांनी ऋषभची फिटनेस टेस्ट घेतली जाईल आणि या टेस्टमध्ये तो पास झाला तरच त्याला क्रिकेट खेळण्याची संधी दिली जाईल. ऋषभ हा आता आयपीएलमध्येच खेळताना पाहायला मिळेल, असे दिसत आहे. ऋषभ यावेळी भारतीय खेळाडूंच सराव करताना मैदानात आला होता खरा, पण ही त्याची एक सदिच्छा भेट होती, असे आपण म्हणू शकतो. कारण ऋषभ आणि या भारतीय सामन्याचा काहीही संबंध नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी असलेल्या बंगळुरुत भारतीय संघ सराव करत होता आणि आपल्या संघातील खेळाडूंना फक्त भेटण्यासाठी तो आला होता.ऋषभ पंत हा आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SMHUPvV

No comments:

Post a Comment