Breaking

Sunday, January 14, 2024

भंडार्लीत कचऱ्याला मोठी आग; नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू, धुराचे लोट गावात https://ift.tt/iCUszRm

दिवा: भंडार्ली डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला मोठी आग लागली असून आगीच्या धुराचे संपूर्ण लोट आजूबाजूच्या गावात पसरून नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास ही आग लागली आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. सध्या या आगीने रौद्र रूप धारण केले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. ठाणे महापालिकेचे १४ गावातील भंडार्ली येथे डम्पिंग ग्राउंड आहे. सध्या या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यात येत नसला तरी येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा डोंगर असून तो हटविण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. डायघर येथील प्रकल्पात सध्या कचरा नेला जात आहे. भंडार्ली येथील कचरा हटविण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास येथील कचऱ्याला आग लागली. धुराचे लोट गावात पसरल्याने ग्रामस्थांनी याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनास दिली. यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करत आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून अद्याप आगीवर नियंत्रण मिळविले गेलेले नाही. रविवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केले असल्याने आग आणखी पसरण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या आगीमुळे धुराचे लोट आजूबाजूच्या गावात पसरून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. आग लागलेल्या ठिकाणाच्या जवळ तबेले असल्याने आग तिथपर्यंत पोहोचू नये म्हणून ग्रामस्थ देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W70dkG6

No comments:

Post a Comment