जळगाव: यावल तालुक्यातील मनवेल गावात एका विवाहित तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुष्पा जितेंद्र कोळी (२५) असं मृत महिलेचे नाव आहे. या विवाहीत तरुणीने २२ जानेवारी सोमवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लाकडी दांड्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. तिला बेशुद्ध अवस्थेत तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुष्पा कोळी यांना तपासून मृत घोषित केले. मयत तरुणीचा भाऊ देविदास जितेंद्र कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करत आहे. तरुणीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. दरम्यान तरूणी मागील तीन वर्षांपासून आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊन तिच्या माहेरी राहत होती. तरूणीने आत्महत्या केल्यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NK24zh1
No comments:
Post a Comment