परभणी: तालुक्यातील सनपुरी येथील एका ३४ वर्षीय युवकाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सचिन रामराव शिंदे (३४) असे मयत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मोर्चे आणि बैठकीत सनपुरी (ता. परभणी) येथील युवक सचिन रामराव शिंदे हा सातत्याने हजर राहत होता. मात्र काही दिवसांपासून समाजाला आरक्षण मिळत नसल्याने सचिन हा चिंताग्रस्त झालेला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास सचिन याने तरुणाने सनपुरी शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सचिन या तरूणाने ज्याठिकाणी आत्महत्या केली. त्या घटनास्थळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना मिळाल्यानंतर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच सचिन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला होता. याठिकाणी सचिन शिंदे हा तरुण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रह धरत होता, अशी माहिती उपस्थित नातेवाईकांकडून मिळाली. सचिन शिंदे याच्या पश्चात आईवडील, पत्नी, भाऊ, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oD1rBCZ
No comments:
Post a Comment