म. टा. प्रतिनिधी, पुणे : नववर्षाच्या प्रारंभापासून पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात वातानुकूलित टॅक्सीचे प्रवासभाडे वाढले आहे. जिल्ह्यात वातानुकूलित टॅक्सीला पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी प्रवाशांना २५ रुपये द्यावे लागणार आहेत.पुणे प्रादेशिक परिहन प्राधिकरणाने (आरटीए) एक जानेवारीपासून वातानुकूलित टॅक्सीची भाडेसुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव संजीव भोर यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खटुआ समितीच्या शिफारशीप्रमाणे काळी-पिवळी टॅक्सीसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३१ रूपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २१ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. या दरांच्या वीस टक्के भाडेवाढ वातानुकूलित टॅक्सींकरिता देण्याची शिफारस खटुआ समितीने केली होती. त्यानुसार, वातानुकूलित टॅक्सीचे प्रवासभाडे वाढविण्यात आले आहे. या दरानुसार आता प्रवासी कॅब कंपन्यांना त्यांचे प्रवास दर ठरवावे लागणार आहेत. परिणामी शहरातील ‘अॅप’आधारित वातानुकूलित टॅक्सींचे दर वाढणार आहेत.Read Latest And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5Evn17A
No comments:
Post a Comment