Breaking

Saturday, January 27, 2024

आता मजा बघा, Landing shortly...! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, किरण सामंतांचा इशारा कोणासाठी? https://ift.tt/2uXRYwz

रत्नागिरी: शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. फेसबुकपेज वरील पोस्ट, व्हाट्सअप स्टेटसमुळे किरण सामंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेनेकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छूक म्हणून चर्चेत असलेल्या किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून किरण उर्फ भैया सामंत यांचे नाव चर्चेत आहे. मात्र भाजपकडूनही या जागेवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर किरण उर्फ भैय्या सामंत यांनी फेसबुक वर केलेल्या विविध प्रकारच्या पोस्ट हा चर्चेचा विषय ठरला आहे. 'आता मजा बघा. Landing shortly'ही लाईन त्यांनी व्हाट्सअप स्टेटसला ठेवली आहे. त्यामुळे किरण उर्फ भैय्या सामंत यांचा इशारा कोणासाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभा निवडणुक उमेदवारीसाठी शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. भावी खासदार असा उल्लेख करत अलीकडेच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीही करण्यात आली होती. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही महायुतीमधील कोणीही कोणतेही वक्तव्य न करता बॅनरबाजीही करू नये, अशा शब्दांत कान टोचले होते. काही महिन्यापूर्वी किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर मशालीचा फोटो ठेऊन मोठा धमाका केला होता.त्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर केल्या आहेत. सोनं अंगावर घातलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात सुद्धा असायला हवी... ही पोस्ट त्यांनी केली होती. किरण सामंत यांनी केलेल्या फेसबुकवरील पोस्टनंतर आता हे टोमणे नेमके कोणासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कधी राजकारणात थेट समोर न येता कोणतेही थेट भाष्य न करणारे किरण सामंत नेमके कोणावर नाराज आहेत? याची चर्चा सध्या रंगली आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या चर्चेनंतर किरण सामंत यांनी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या राजापूर लांजा मतदारसंघातही आपले लक्ष केंद्रित केलं आहे. किरण सामंत यांच्यासाठी त्यांच्या कन्या अपूर्वा किरण सामंत याही आता मैदानात उतरल्या आहेत. 'बाबा तुला या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातही खूप मोठं काम सर्वसामान्य जनतेसाठी करावे लागणार आहे', अशी भावनिक साद त्यांची सुकन्या अपूर्वा सामंत यांनी चार दिवसांपूर्वी झालेल्या भाषणातून घातली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/q53erFu

No comments:

Post a Comment