Breaking

Friday, February 23, 2024

धक्कादायक! आधी डोळ्यात मिरची पूड फेकली, नंतर बॅटने मारहाण, सासूने जावयाला संपवलं https://ift.tt/ARJYwjF

बुलढाणा: आज पण लग्नानंतर जावयाकडे पाहण्याचा एक विशेष दृष्टिकोन असतो. जावयाला मान दिला जातो. विशेषत: ग्रामीण भागात याचे महत्त्व अधिक असते. पण जेव्हा चक्क सासूने रागाच्या भरात आपल्या जावयाला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे माहेरी असलेल्या पत्नीच्या घरी जाऊन व्यक्तीने शिवीगाळ केली. तसेच सासू आणि पत्नी दरवाजा उघडत नसल्याने जावयाने दारावर दगडाने मारा सुरू केला. यावेळी संतप्त सासूने मागच्या दारातून येत जावयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर बॅटने केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेगाव येथील फुलेनगरातील रहिवासी दीपक गजानन हाडोळेला मद्यपानाचे व्यसन होते. त्याच्या व्यसनाला कंटाळून त्यांची पत्नी वैष्णवी ही मागील ४-५ वर्षांपासून जवळा येथे आई सुशीला अवधूत काळे ह्यांच्यासोबत राहत होती. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० ते ७ वाजेच्या सुमारास दीपक हाडोळे हा मद्यपान करून जवळा बु. येथे आला. तसेच सासूच्या घरासमोर शिवीगाळ करत होता. घराच्या दरवाजावर लाथा आणि दगड मारून उघडण्याचा प्रयत्न करत होता. सासू किंवा पत्नी दरवाजा उघडत नसल्यामुळे मोठमोठे दगड दारावर मारत होता. त्यामुळे सासू सुशीला काळे ही घराच्या मागील दरवाजातून बाहेर आली. दीपक हाडोळेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. तसेच बाजूला पडलेल्या लाकडी बॅटने त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाची पत्नी वैष्णवी दीपक हाडोळेने शेगाव ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी सुशीला काळेला अटक करण्यात आली. पुढील तपास पीएसआय गजानन शिंदे करीत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/G65qERf

No comments:

Post a Comment