Breaking

Thursday, February 22, 2024

करुणा मुंडेंचं ठरलं! धनंजय मुंडेंविरोधात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, परळीतून लढण्याचा निर्णय https://ift.tt/BMd5eL1

नांदेड: करुणा शर्मा मुंडे ह्या नेहमी चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी स्वराज्य शक्ती सेना हा नवीन पक्ष काढून राजकीय आखाड्यात उतरल्या आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणूक ही मंत्री धनंजय मुंडेंविरोधात परळीतून लढण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या घोषणेने परळी विधानसभेची निवडणूक वर्सेस धनंजय मुंडे अशी रंगतदार लढत होणार आहे. गुरुवारी करुणा शर्मा यांनी आपल्या नांदेड दौरा दरम्यान ही घोषणा केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच स्वराज्य शक्ती सेना पक्षवाढी साठी करुणा शर्मा मुंडे ह्या राज्यभर दौरा करत आहे. गुरुवारी त्या नांदेडला आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला. स्वराज्य शक्ती सेना ही अन्यायाविरोधात लढणारा पक्ष आहे. सध्या सगळे पक्ष एकत्र आले आहेत. एकत्र येऊन गोरगरीब जनतेवर अन्याय अत्याचार होतं आहे. या अन्यायाविरोधात स्वराज्य शक्ती सेना लढणार, असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. देशात लोकशाही संपली आहे. घराणेशाहीमुळे हुकुमशाही चालू आहे. भाजप पक्ष हा हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या लोकांना घेऊन मोठ्या पदावर नेमणूक केलेली आहे. त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना आज न्याय भेटत नाही, असं देखील त्या म्हणाल्या. दरम्यान स्वराज्य शक्ती सेना आगामी लोकसभा आणि विधासभेच्या सर्व जागा लढणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली. शिवाय त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक परळीतून धनंजय मुंडे विरोधात लढणार असल्याचे म्हणाल्या. परळीची विधानसभा ही नवरा विरुद्ध बायको होणार असून यात बायकोचा विजय होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाराज नेत्यांना स्वराज्य शक्ती सेनेत येण्याची ऑफरराज्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तीन तीन पक्ष आहे. कोण कुठे जातो याची कल्पना देखील करता येणार नाही. भाजप देखील घोटाळे करणाऱ्या नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना पदे देत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेते आज घडीला नाराज आहेत. इतर बड्या पक्षात देखील नाराजीची परिस्थिती आहे. तेव्हा नाराज असलेल्या नेत्यांनी स्वराज्य शक्ती सेनेत यावे, असं आवाहन करुणा मुंडे यांनी केलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/R1v4hm8

No comments:

Post a Comment