Breaking

Tuesday, February 6, 2024

'या' तीन कंपन्यांचे आयपीओ बाजारात; १,७०० कोटींची उभारणी, 'अशी' होईल भांडवल उभारणी https://ift.tt/bL1iDly

नवी दिल्ली: चालू कॅलेंडर वर्षात प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) मंदावते की काय असे वाटत असतानाच, तीन कंपन्यांनी आयपीओ आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. राशी पेरिफेरल्स, जन स्मॉल फायनान्स बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक या तीन कंपन्या बुधवारी आयपीओ घेऊन भांडवल बाजारात येत असून यातून १,७०० कोटी रुपयांची उभारणी करण्यात येणार आहे. या तिन्ही कंपन्यांचे हे पहिलेच आयपीओ आहेत. याखेरीज ९ फेब्रुवारी रोजी १,६०० कोटी रुपयांचा एन्टरो हेल्थकेअर सोल्युशन्सचा आयपीओ येणार आहे. शिवाय अपिजय सुरेंद्र पार्कचा ९२० कोटी रुपयांच्या आयपीओचा सध्या भरणा सुरू आहे. याआधी जानेवारी महिन्यात पाच कंपन्यांनी आयपीओद्वारे एकूण ३,२६६ कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी केली होती. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अशा प्रकारे भांडवल उभारणी झाल्यामुळे बाजारतज्ज्ञ चालू वर्षातील आयपीओंबाबत सकारात्मक आहेत. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर भांडवलाचा ओघ येत असल्यामुळे विदेशी आणि देशातील वैयक्तिक गुंतवणूकदार यांच्या पैशांकडे अनेक कंपन्या लक्ष ठेवून आहेत. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी आहे. ही कंपनी ६०० कोटी रुपयांची उभारणी करणार असून त्यासाठी सर्व समभाग नवे आणणार आहे. यामध्ये ऑफर फॉर सेलअंतर्गत समभागांची विक्री होणार नाही. उभारण्यात येणाऱ्या ६०० कोटींपैकी ३२६ कोटी रुपये कर्जांची फेड करण्यासाठी वापरले जाणार आहेत. २२० कोटी रुपये भांडवलाची वाढती गरज भागवण्यासाठी वापरले जातील. जन स्मॉल फायनान्स बँकया बँकेचे मुख्यालय बेंगळुरू येथे असून टीपीजी आणि मॉर्गन स्टॅनले यांचा या बँकेला पाठिंबा आहे. बँक आयपीओअंतर्गत दरपट्ट्यातील कमाल किंमतीने ४६२कोटी रुपयांचे समभाग विकणार आहे. उर्वरित १०८ कोटी रुपयांची उभारणी ऑफर फॉर सेलअंतर्गत केली जाणार आहे. हा आयपीओ ५७० कोटी रुपयांचा आहे. भांडवलाची गरज भागवण्यासाठी तसेच भांडवल पर्याप्तता प्रमाण सुधारण्यासाठी ही भांडवल उभारणी करण्यात येणार आहे. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकया बँकेचा आयपीओ ५२३ कोटी रुपयांचा असून ४५० कोटी रुपये भांडवल उभारणीसाठी नवे समभाग विक्रीला आणण्यात येणार आहेत. ऑफर फॉर सेलअंतर्गत ७३ कोटी रुपये भांडवलाची उभारणी केली जाणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये बँकेचे प्रवर्तक स्वतःचा ५ टक्के हिस्सा विकणार आहेत. अशी होईल भांडवल उभारणी कंपनी आयपीओ (कोटी रु.) दरपट्टा (रु.) लॉट (भागसंख्या)अपिजय सुरेंद्र पार्क ९२० १४७ ते १५५ ९६एन्टरो हेल्थकेअर सोल्युशन्स १,६०० १,१९५ ते १,२५ ९६कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक ५२३ ४४५ ते ४६ ३२जन स्मॉल फायनान्स बँक ५७० ३९३ ते ४१४ ३६राशी पेरिफेरल्स ६०० २९५ ते ३११ ४३


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2BjkS3Q

No comments:

Post a Comment