सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ आणि २०२९ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे दिग्गज नेते असताना देखील भाजपने सोलापुरातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. बघता बघता सोलापुरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात भाजपने कब्जा करत आपले वर्चस्व स्थापित केले आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप सोलापुरात नवा उमेदवार देत आहे. यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडून खेचून आणण्यासाठी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापुरात खरी फाईट काँग्रेस आणि भाजप अशी होईल.भाजपमध्ये तीन उमेदवारांची लॉबिंगआगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अमर साबळे हे जोरदार तयारीत लागले आहेत. दुसरीकडे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील माळशिरस तालुक्याचे विद्यमान भाजप आमदार राम सातपुते यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे. माजी खासदार शरद बनसोडे यांना देखील भाजप पुन्हा तिकीट देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तिन्ही उमेदवार आपापल्या परीने पक्षात लॉबिंग करत आहेत. एकीकडे काँग्रेस धर्मनिरपेक्ष राजकारणावर भर देत असताना, भाजप आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला पुढे घेऊन जाणारा नेता सोलापुरात शोधत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेने भाजपमध्ये उत्साहरे नगर या गृहप्रकल्पाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी सोलापुरात येऊन गेले. रे नगरच्या उद्घाटनाला आलेले नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील भाजपला अधिक बळकटी देऊन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. मोदी गॅरंटीची हमी देत सोलापूरकरांना आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी लाटेला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे रोखू शकतील का? हा मोठा प्रश्न आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सोलापुरात, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना(शिंदे गट) आणि भाजपला फाईट द्यावी लागणार आहे.सध्याची सोलापूर मतदारसंघातील परिस्थितीसोलापूर लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदासंघात विभागला गेला आहे. सोलापूर शहर-मध्य, सोलापूर शहर-उत्तर, सोलापूर शहर-दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा हे विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभेत आहेत. यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य- प्रणिती शिंदे (काँग्रेस), सोलापूर उत्तर- विजय देशमुख (भाजप), सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख (भाजप), मोहोळ-यशवंत माने (राष्ट्रवादी), पंढरपूर मंगळवेढा- समाधान अवताडे (भाजप) अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी (भाजप) यांचा विजय झाला आहे. म्हणजेच चार भाजप ,एक राष्ट्रवादी आणि एक काँग्रेस अशी परिस्थिती सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने सोलापूरमध्ये आपलं बळ वाढवलं आहे.सोलापूरचा राजकीय इतिहास१९५२ ते १९५७ पर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार निवडून आले. तर १९६२ ते १९९१ पर्यंत सलग काँग्रेसचे खासदार निवडून आले. त्यानंतर कोणत्याही पक्षाला सातत्य ठेवता आलेले नाही. २०१४ मध्ये भाजपच्या शरद बनसोडे यांना २ लाख ७२ हजार ८८७ मते मिळाली होती. तर सुशीलकुमार शिंदे यांना १ लाख ८९ हजार ३५७ मते मिळाली होती. सुशीलकुमार शिंदे १९९८ साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर १९९९ मध्ये देखील दुसऱ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले. २००३ मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून आले. तर २००४ मध्ये सुभाष देशमुख यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात निसटता विजय मिळाला. २००४ च्या लोकसभेला सुशीलकुमार शिंदेंच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आले होतं. त्या ५ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाल्या. २००९ मध्ये सुशीलकुमार शिंदे खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी केंद्रात यूपीए सरकारमध्ये ते देशाचे गृहमंत्री झाले. मात्र २०१४ मध्ये मोदी लाटेचा त्यांना फटका बसला. २०१४ पासून सोलापुरातील शिंदेशाहीला घरघर लागली आहे.दोन वेळा सुशीलकुमार शिंदेंचा पराभव२०१९ च्या मोदी लाटेचा सुशीलकुमार शिंदेंना जबरदस्त फटका बसला. गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जय सिध्देश्वर महाराजांनी सुशीलकुमार शिंदेंचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव करत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनाही दणका दिला. २०१४ मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत झाली होती. मात्र 2019 मध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत झाली. सोलापूर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती राखीव मतदार संघ असल्याने या ठिकाणी अकोल्यासोबत सोलापुरातही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सुरूवातील दुरंगी वाटणारी ही लढत तिरंगी करण्यात प्रकाश आंबेडकरांना यश आले. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांना सुमारे दोन लाखांच्या आसपास मतांनी पराभूत केले होते. शरद बनसोड यांना ५ लाख १७ हजार मते पडली होती तर सुशील कुमार शिंदे यांना ३ लाख ६८ हजार मते पडली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघांचा बनलेला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना ५ लाख २३ हजार ३५२ मते मिळवून विजयी झाले. सुशीलकुमार शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर होतं- १ लाख ५८ हजार ०७८ मतेविद्यमान भाजप खासदारांवर नाराजीसोलापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान भाजप खासदारांवर मतदारसंघातील मतदारांची नाराजी आहे. सोलापूरला आजतागायत दररोज पाणी पुरवठा होत नाही.सोलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला नाही,दररोजची पाणी पुरवठा योजना आजतागायत रखडली आहे.भाजपचे विद्यमान खासदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात क्वचितच दिसतात.2019 मध्ये भाजप कडून विजयी होताच सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यानी भाजप खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराजांच्या जातीच्या दाखल्यावर हरकती घेतल्या.बोगस जातीच्या दाखल्यामुळे भाजपचे खासदार अडचणीत आले.निवडून आल्या पासून भाजपचे खासदार कधीतरी मतदारसंघात काम करताना दिसून येतात.लोकसभेत देखील खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराजांची गैरहजेरी सोलापूरकराना सर्वश्रुत आहे.सोलापुरातील मतदार नेहमी विद्यमान भाजप खासदारांवर नाराजी व्यक्त करतात.बापलेकीसमोर भाजपच्या हिंदुत्वाचं मोठं आव्हानसोलापूर लोकसभा मतदारसंघात अनेक हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू गर्जना मोर्चा, हिंदू राष्ट्र सभा यांच्या मोठमोठ्या सभा झाल्या. वेगवेगळ्या हिंदू संघटनांनी सहा विधानसभा मतदारसंघात कडव्या हिंदुत्वाचा प्रचार केला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना या कडव्या हिंदुत्वाला टक्कर द्यावी लागणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम ,पद्मशाली, मोची, लिंगायत, धनगर,आदी समाजाची लोकसंख्या जास्त आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gC1HyEw
No comments:
Post a Comment