Breaking

Thursday, February 22, 2024

अभिनय सम्राटाचा सन्मान! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान https://ift.tt/DawiS3I

मुंबई: महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३' सिनेविश्वाचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर केला गेला आणि सर्वत्र आनंद पसरला. २२ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला असून प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा यांना यांना यांच्या हस्ते प्रदान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२२' हा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले. एकूण ३७ पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात आले. या विलोभनीय सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची तसंच कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला.

महाराष्ट्र भूषण सोहळा

वरळी येथील डोम, एनएससीआय (नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता ५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला असून, या सोहळ्यात हे मानाचे पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सोहळ्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई शहर उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा ही मंडळीही या कार्यक्रमात उपस्थित होती. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींनीही उपस्थिती दर्शवली. या सोहळ्यासाठी मान्यवर आणि मानकऱ्यांसह मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजही उपस्थित होते. निवेदिता सराफ, अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, महेश मांजरेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, कविता लाड, ललित प्रभाकर, आदिती सारंगधर असे अनेक कलाकार या सोहळ्यात उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले हे मानाचे पुरस्कार

महाराष्ट्र भूषण २०२३

अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

राजकपूर जीवनगौरव पुरस्कार

२०२०- अरुणा इराणी, ज्येष्ठ अभिनेत्री२०२१- मिथुन चक्रवर्ती, ज्येष्ठ अभिनेते २०२२- हेलन, ज्येष्ठ अभिनेत्री

राजकपूर विशेष योगदान पुरस्कार

२०२०- जे. पी. दत्ता, ज्येष्ठ दिग्दर्शक २०२१ - सोनू निगम, गायक२०२२- विधू विनोद चोप्रा, दिग्दर्शक

चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार

२०२०- स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), अभिनेते२०२१- उषा चव्हाण, ज्येष्ठ अभिनेत्री २०२२- उषा नाईक, ज्येष्ठ अभिनेत्री

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार

२०२०- गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक२०२१- रवींद्र साठे, ज्येष्ठ पार्श्वगायक२०२२- नागराज मंजुळे, अभिनेते-दिग्दर्शक यांना जाहीर झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yBNi57L

No comments:

Post a Comment