Breaking

Thursday, February 1, 2024

भरधाव कारचालकाची दोन दुचाकींना धडक; अपघातात चिमुकला दरीत पडला, प्रकृती गंभीर https://ift.tt/DUFaQHR

जळगाव: यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. यात भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवर बसलेला १४ वर्षाचा मुलगा हा थेट नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळला तर इतर दोघे असे तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना भुसावळ येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कार चालक हा घटनास्थळावरून पसार झाला तर या कारमध्ये प्रत्यक्षदर्शींना दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहे. कदाचित कारचालक हा दारूच्या नशेत असल्याने अपघात घडला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत यावल पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, यावल - भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावाजवळ मोर नदीवर पूल आहे. या पुलावरील वळणावर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कार घेऊन अज्ञात चालक येत होता. तर यावलकडून भुसावळकडे दुचाकी दूध विक्रीकरता अरविंद प्रभाकर पाटील (४५ रा. बोरावल खुर्द) हे जात होते. त्यांच्या मागेचं अंजाळे येथून भुसावळकडे दुचाकी पिंटू शेकोकार आणि त्यांचा मुलगा सोहम शेकोकार (१४ दोघं रा. अंजाळे) हे जात होते. तेव्हा या दोन्ही दुचाकींना भरधाव वेगात कारने धडक दिली. धडक प्रचंड वेगाने दिल्याने दुचाकीवर मागे बसलेला सोहम शेकोकार हा पुलावरून नदीपात्रात कोसळला. दोन्ही दुचाकी चालक आणी बालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने नागरिकांच्या मदतीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कार चालक हा पसार झाला असून नागरिकांनी यावल पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांकडून रात्री उशीरा पर्यंत अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ki06FVU

No comments:

Post a Comment