Breaking

Tuesday, February 20, 2024

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल सामन्यातून बाहेर https://ift.tt/gZEVjeW

भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्ध २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्ध रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी संघातून मुक्त करण्यात आले आहे. या मालिकेचा कालावधी आणि त्यांनी अलीकडे खेळलेले सातत्यपूर्ण क्रिकेट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय आश्चर्यकारक नाही. कारण त्याने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ८०.५ षटके टाकली आहेत. गोलंदाजांवरील कामाचा बोजा सांभाळण्यासाठी भारतीय संघाने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला विश्रांती दिली. राजकोट कसोटीत त्याने संघात पुनरागमन केले. या कसोटीच्या पहिल्या डावात सिराजने चार विकेट घेतल्या होत्या. भारतीय संघाने हा सामना ४३४ धावांनी जिंकला होता. रांचीमध्ये मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे. तसे न झाल्यास ७ मार्चपासून धरमशाला येथे सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी घरच्या संघाला बुमराहची गरज असेल. दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल चौथ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यासाठी तो तंदुरुस्त होईल की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. मालिकेतील पहिल्या सामन्यात राहुल भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. यानंतर दुखापतीमुळे तो पुढील दोन सामने खेळू शकला नाही आणि आता चौथ्या कसोटी सामन्यातही तो संघाचा भाग नाही. दरम्यान याआधी राजकोट येथील तिसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर पडलेल्या मुकेश कुमारचा आता रांची कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ:रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/s8Oy4TJ

No comments:

Post a Comment