Breaking

Monday, February 19, 2024

आमदार गणपत गायकवाड यांचा भाऊ अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांनाही मारहाण https://ift.tt/gzIsiVb

कल्याण: पूर्वेतील परिसरातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कल्याण तिसाई चौक परिसरातील जरीमरी व्हिजन या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गाडी पार्किंगच्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळीने कार्यालयात शिरून कार्यालयाची तोडफोड करत कार्यालयामध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना देखील बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. मात्र कल्याण पूर्वेतील राजकीय घटना पाहता हे कृत्य राजकीय वादातून नाही ना? असा सवाल उपस्थिती केला जात आहॆ. त्यामुळे हा प्रकार नक्की काय हे अंतिम तपासातून समोर येणार आहे. दरम्यान कल्याण पूर्व मतदार संघातील जवळील द्वारली येथील जागेच्या वादातून हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या खळबळजनक घटनेनंतर आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करन्यात आली. त्यानंतर अन्य दोन जणांना अटक केली. या पाचही जणांना १४ दिवसाांची पोलीस कोठडी देण्यात आली. १४ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र आता गायकवाड यांच्या भावाच्या ऑफिस तोडफोड झाल्याने पुन्हा एकदा याला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहॆ. मात्र पोलीस सूत्रांनी माहिती दिलेल्यानुसार यात राजकीय वाद नसल्याचे सांगितले जात आहॆ.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/j56b1zY

No comments:

Post a Comment