कराची: पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाकडून पंतप्रधानपदासह संयुक्त सत्तावाटपाचा देण्यात आलेला फॉर्म्युला आपण नाकारला असल्याची माहिती पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष यांनी दिली. त्यामुळे पाकिस्तानातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. जनादेश असल्याशिवाय आपल्याला पंतप्रधानपद नको, असे बिलावल यांनी म्हटले आहे. ३५ वर्षीय भुट्टो यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले असून पीपीपीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालामध्ये पीपीपी ५४ जागांवर विजयी होऊन तिसऱ्या स्थानावर आहे. तर तुरुंगात असताना अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थकांना १०१ जागांवर विजय मिळाला असून त्यांचा पाकिस्तान ए इन्साफ पहिल्या स्थानी आहे. तर नवाझ शरीफ यांच्या पक्षाला ७५ जागांवर विजय मिळाला आहे. सत्तास्थापनेसाठी १३३ प्रतिनिधींचे पाठबळ आवश्यक असते. पीपीपी आणि पीएमएल-एन या पक्षांनी निवडणूक निकालानंतर युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांचे सत्तावाटपावर एकमत होऊ शकले नाही. पीपीपीच्या विजय साजरा करण्यासाठी सिंध प्रांतात थट्टा येथे आयोजित सभेला बिलावल यांनी संबोधित केले.‘पीएमएल-एन मला सांगितले की त्यांना तीन वर्षे पंतप्रधानपद हवे आहे तर नंतर उर्वरित दोन वर्षे तुम्ही हे पद घेऊ शकता. मात्र, मी त्यास नकार दिला. मला अशाप्रकारे पंतप्रधान व्हायचे नाही, हे मी त्यांना ठामपणे सांगितले. जेव्हा पाकिस्तानचे नागरिक मला निवडून देतील, तेव्हाच मी पंतप्रधान होईन’,असे बिलावल म्हणाले. ‘आमचा पक्ष किंवा मी कोणतेही मंत्रिपद मागणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. वडील आसिफ अली झरदारी हे पीपीपीचे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील’, असेही बिलावल म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NQCjlT7
No comments:
Post a Comment