Breaking

Sunday, February 18, 2024

दीड महिन्यात ३,६३७ कोटींची वसुली होणार? मालमत्ता करवसुलीचे मुंबई महापालिकेसमोर आव्हान https://ift.tt/8Oh6Mpa

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने क्षेत्रातील सन २०२३-२४च्या मालमत्ता करवाढीला दिलेल्या स्थगितीचा अध्यादेश या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने रखडलेली मालमत्ता करदेयके वितरित करण्याची प्रशासकीय तयारी सुरू केली असून ती फेब्रुवारीअखेरपर्यंत मालमत्ताधारकांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने २०२३-२४ मध्ये मालमत्ता कराचे ४,५०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट सुधारित केले असून आतापर्यंत ८६३ कोटींची वसुली झाली आहे. मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपत असून हजारो कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.पालिकेने सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयास ५ फेब्रुवारीला मंजुरी दिल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. आता याबाबतचा अध्यादेश निघाल्यानंतर पालिकेला मागील वर्षीची देयके काढता येणार आहेत. करवाढ करावी की नाही, या घोळात पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या कराची दोन्ही सहामाही देयके काढलेली नाहीत. डिसेंबर महिन्यात ऑनलाइन पद्धतीने देयके वितरित करण्यास सुरुवात केली. मात्र ही १५ ते २० टक्के वाढीची देयके असल्यामुळे त्यास राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला.सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या भांडवली करप्रणालीत काही सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. ते न करताच करवाढ केल्यामुळे या करवाढीला विरोध झाला होता. त्यानंतर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ही देयके मागे घेऊन नवीन देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारच्या करवाढ न करण्याच्या ठोस निर्णयानंतर अखेर नवीन देयके देण्याचा पालिकेसमोरचा पेच सुटला आहे. मुंबईत सुमारे आठ ते नऊ लाख मालमत्ताधारक असून त्यांच्यासाठी नव्याने देयके छापावी लागणार आहेत. काही मालमत्तांधारकांना ऑनलाइन तर काहींना घरपोच देयके दिली जातात. विभाग कार्यालयात येणाऱ्या व छापील देयकाचा आग्रह धरणाऱ्या करधारकाला छापील देयक दिले जाण्याच्या सूचना करनिर्धारण व संकलन विभागाने विभाग कार्यालयांना दिल्या आहेत.

अपेक्षित लक्ष्य गाठता आले नाही

करधारकांना ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरावा लागणार आहे. त्यावर प्रशासनाला आपले मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठता येणार आहे. मालमत्ता कर हा पालिकेचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. २०२३-२४ मध्ये पालिकेने मालमत्ता करापोटी सहा हजार कोटींचे उत्पन्न अंदाजित केले होते. दरवर्षी जानेवारी अखेरपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट गाठणे शक्य होते.

मालमत्ता कर कुणाला?

मालमत्ताधारक : ४ लाख २० हजारनिवासी : १ लाख ३७ हजारव्यावसायिक : ६५ हजारांहून अधिकऔद्योगिक : सहा हजारभूभाग आणि इतर : १२ हजार

मालमत्ता कर

२०२३-२४चे सुधारित लक्ष्य : ४,५०० कोटीजानेवारी २०२४ पर्यंत वसुली : ८६३ कोटी२०२४-२५चे लक्ष्य : ४,९५० कोटी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Jw10sLf

No comments:

Post a Comment