Breaking

Saturday, February 17, 2024

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, पोलिसांचा चोख बंदोबस्त, कसा असेल दौरा? https://ift.tt/ifjTDPM

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची आज, रविवारी (ता. १८) तोफ धडाडणार आहे. ठाकरे गटाच्या शिवसेना शाखांना आदित्य ठाकरे भेटी देणार असून, त्यांच्या जंगी स्वागताची जोरदार तयारी पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटनही होणार असून याठिकाणी त्यांच्याकडून उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला जाणार आहे.शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातील जाहीर राजकीय कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. याआधी घोडबंदर रोड येथील रोजगार मेळावा, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील आरोग्य शिबिर, दहीहंडी उत्सव अशा कार्यक्रमांना आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिलांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चातही आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता ठाकरे यांच्या या दौऱ्याला ठाणे शहराच्या वेशीवरील आनंदनगर जकात नाका येथून सुरुवात होणार आहे. यावेळी आदित्य यांचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सर्व प्रमुख चौकांमध्ये स्वागत केले जाईल. त्यानंतर ठाण्यात ओवळा-माजिवडा, ठाणे शहर व कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शिवसेना ठाकरे गटाच्या शाखांना आदित्य ठाकरे भेट देणार असल्याचे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी सांगितले.असा असेल दौरा- घोडबंदर रोड - आनंदनगर शाखा : सायंकाळी सहा वाजता- मानपाडा रोड - मनोरमानगर शाखा : सायंकाळी सात वाजता- ठाणे पालिका मुख्यालयाजवळ - चंदनवाडी शिवसेना शाखा : रात्री आठ वाजता- जिजामातानगर शिवसेना शाखा उद्घाटन : रात्री नऊ वाजता पोलिसांचा चोख बंदोबस्तशिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी मुंब्र्यात वादग्रस्त शिवसेना शाखेच्या जागेची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले असताना, प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या अनुषंगाने पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे.भेटीगाठींना वेगलोकसभा निवडणुका तोंडावर असून, आदित्य ठाकरे यांचे सध्या ‘महानिष्ठा, महान्याय महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत विविध शहरांत भेटीगाठी आणि दौरे सुरू आहेत. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच कल्याण लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी शक्तिप्रदर्शन करत पदाधिकाऱ्यांना संबोधित केले होते. तर गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कल्याण लोकसभेचा दौरा केला होता. त्यामुळे या राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींना गेल्या काही दिवसांत वेग आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iKVyn4A

No comments:

Post a Comment