Breaking

Saturday, February 17, 2024

देशात अन् राज्यात भाजपची हुकूमशाही, लोणावळ्यातील शिबिरात नाना पटोले यांचा आरोप https://ift.tt/QgLjyHC

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा : ‘खोटे बोला; पण रेटून बोला या पद्धतीने भाजप जनतेमध्ये भ्रम निर्माण करीत आहे. देशात भाजपच्या वतीने जी खोटारडी व्यवस्था आली आहे, त्याचे वास्तव जनतेसमोर मांडण्याचा निर्णय काँग्रेसच्या शिबिरात घेतला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला जातो. एक प्रकारे देशात व राज्यात तानाशाही सुरू आहे,’ असा आरोप यांनी केला.‘सात आमदारांना कारणे दाखवा नोटीस’शिबिराला गैरहजर राहिलेल्या काँग्रेसच्या आमदारांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले, ‘अनेक आमदारांनी या शिबिरात हजेरी लावली आहे. मात्र, काहींनी मतदारसंघातील पूर्व नियोजित कार्यक्रमांना जाण्यासाठी परवानगी घेतली होती. काहींनी यापूर्वीच त्यांच्या महत्त्वाच्या वैयक्तिक कामांच्या कारणांमुळे उपस्थित न राहण्यासंदर्भात कळवले होते. मात्र, ज्या सात आमदारांनी कोणतीही कल्पना न देता गैरहजेरी लावली, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यासंदर्भात पक्ष प्रभारींना सूचना दिल्या आहेत.’ मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही : प्रणिती शिंदे‘लोकांना भाजप नकोय. भाजप फक्त हवा करीत आहे. आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. त्यामुळे काही झाले तरी मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही,’ असे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले‌. ‘चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसला संपवण्याची स्वप्न पाहत आहेत. त्यांचा स्थानिक पातळीवरील अभ्यास कमी आहे. अशोक चव्हाण भाजपसोबत गेले तरी नांदेडमधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. मी शेवटपर्यंत काँग्रेस सोबतच काम करणार असून, एक दिवस भाजपला संपवणारच,’ असे शिंदे यांनी सांगितले.‘मुस्लिमांना लोकसभेच्या तीन जागा द्या’राज्यात मुस्लिम जनसंख्या साडेअकरा टक्के असताना मुस्लिम समाजाला लोकसभेत आणि विधानसभेत पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याबद्दल माजी खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने मुस्लिम समाजाला महाराष्ट्रातून लोकसभेच्या किमान तीन आणि विधानसभेसाठी २० जागा द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lAVi915

No comments:

Post a Comment