म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘देशभरात ‘ईडी’सह विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांवर ज्या कारवाया सुरू आहेत त्या पाहता हे राजकारण भविष्यात भाजपला परवडणार नाही,’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला.सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेले नसते. उद्या जेव्हा सत्ताबदल होईल, तेव्हा पलीकडच्या बाजूनेही दामदुपटीने कारवाई होईल, तेव्हा काय कराल, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘मविआ’त कोण जाईल, यांचा काही भरवसा आहे का? इंडिया आघाडीत नितीशकुमारही होते, ते कुठे गेले? असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरेंनी ‘मविआ’त जाण्यास नकार दिला. नाशिक दौऱ्यात शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ‘ईडी’कडून कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि इतर राज्यांत विरोधी पक्षांतील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणा लागलेल्या आहेत. हे राजकारण पुढे जाऊन सध्याचे सत्ताधारी असलेल्या भाजपला परवडणार नाही, अशी टीका करीत पूर्वीच्या काळात झालं म्हणून आपणही तेच करायचं, हे योग्य नाही, असा सल्लाही दिला. मराठी शाळा सेमी इंग्रजी केल्याशिवाय त्या चालणार नाहीत. प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला इंग्रजी यावे, असे वाटते. हा वैयक्तिक प्रश्न असल्याने त्याकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. सेमी इंग्रजी शाळांतील पटसंख्या शंभर टक्के असल्याचा दावाही ठाकरेंनी केला.टोलचा पैसा राजकीय पक्षांच्या फंडातमाझा टोलला विरोध नाही. पण, टोलवर जी रोकड जमा होते, त्याला विरोध आहे. टोलमधून किती गाड्या गेल्या, किती टोल वसूल झाला, त्यातून सरकारला किती पैसा गेला आणि कंत्राटदाराच्या खिशात किती पैसा गेला? याच्यात कोणतीही पारदर्शकता नाही. टोलवरील पैसा हा कंत्राटदाराच्या खिशात जातो. तिथून तो राजकीय पक्षांच्या फंडात जातो, अशा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. मलाही कंत्राटदारांकडून पैशांच्या ऑफर आल्या होत्या. ‘मी इथेच मारीन, टोलवरही जाऊ देणार नाही,’ असा दम देत कंत्राटदारांची ऑफर आपण स्वीकारली नाही, असा खुलासाही ठाकरेंनी केला. राज ठाकरे म्हणाले...-२०१४ मध्ये आपण पंतप्रधान मोदींना दिला नव्हता पाठिंबा-मोदींसारखी व्यक्ती पंतप्रधानपदी असावी अशी मांडली होती इच्छा-आताही ‘पीएम’बाबत चाचपणी झाली, की त्याबाबत सांगेन-गोडसे, गांधींऐवजी महागाईसह अन्य प्रश्नांवर बोला-महाराष्ट्रातच मराठी माणसाला घर नाकारले जाते-त्यावर कुणाला बोलायला वेळ नाही हे दुर्दैवीच
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Z7xB4Pb
No comments:
Post a Comment