Breaking

Saturday, February 3, 2024

चिमुकल्याची सुट्टी ठरली अखेरची; वडिलांसोबत कामावर गेला, वाटेतच अनर्थ, मुलाच्या जाण्यानं कुटुंब हळहळलं https://ift.tt/7QpbrYa

पालघर: कंटेनर आणि तीन चाकी टेम्पोचा भीषण अपघात वाघोबा खिंड येथे घडला आहे. कंटेनर टेम्पोवर उलटल्याने कंटेनर खाली टेम्पोमधून प्रवास करणारे वडील आणि मुलगा असे दोघेजण टेम्पोमध्येच अडकले. या भीषण अपघातात अकरा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हार्दिक कोळी असे या अपघातातील मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकरा वर्षांचा हार्दिक सुट्टी असल्याने टेम्पो चालक असलेल्या आपल्या वसई येथे कामासाठी निघालेल्या वडिलांसोबत त्यांच्या तीन चाकी टेम्पोतून निघाला होता. पालघर-मनोर मार्गावर वाघोबा खिंडीत पालघरच्या दिशेने येणारा एक भारधाव कंटेनर खिंडीतील वळणावर या वसईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोवर उलटला. कंटेनर टेम्पोवर उलटल्याने टेम्पोतून प्रवास करणारे वडील आणि अकरा वर्षाचा हार्दिक कंटेनर खाली टेम्पोत दबले गेले. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस व वाहतूक शाखेचे पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर खाली टेम्पोत अडकलेल्या हार्दिक आणि त्यांच्या वडिलांना पोलीस, अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिकांनी बाहेर काढले. मात्र अकरा वर्षाच्या हार्दिकचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडील किरकोळरित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंटेनर आणि तीन चाकी टेम्पोचा अपघात घडल्यानंतर वाघोबा खंडीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hpZBtQ7

No comments:

Post a Comment