Breaking

Wednesday, February 7, 2024

बाळू मामांच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्ल्याने विषबाधा, २ हजार भक्तांची प्रकृती बिघडली https://ift.tt/jzWTuc4

नांदेड : लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळू मामाच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्याने जवळपास दोन हजार भक्तांना विषबाधा झाली. त्यामुळे उपस्थित भाविकांसह प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. बुधवारी भल्या पहाटे भक्तांना विषबाधा झाल्याने लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालय, विष्णुपुरी येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल , खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करण्यात आलेकाय घडलं?लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळू मामांच्या मेंढ्या आल्या होत्या. तेथे मंगळवारी एकादशी असल्याने महाप्रसादात उपवसासाठी भगर करण्यात आली होती. भगर खाल्ल्यानंतर बुधवारी भल्या पहाटे असंख्य भक्तांना मळमळ, उलटी, रक्तदाब खालावण्यासह अन्य शारीरिक त्रास सुरू झाला. हरणवाडी, रिसनगाव आष्टुर, देवाला तांडा, यासह अन्य गावांतील जवळपास दीड हजारांपेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले. त्रास होत असणारे रुग्ण लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात; तसेच खासगी रुग्णालयात दाखल झाले. जवळपास ६०० जणांना विष्णुपुरी येथे हलविण्यत आले. ही घटना केल्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर यांनी उपजिल्हा रुग्णालय, खासगी दवाखाने, विष्णुपुरी येथे भेट देऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली; तसेच वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टरांशी चर्चा केली आणि रुग्णांवर करण्यात येणाऱ्या औषधोपचारांची माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. वैद्यकीय सुविधा आणि उपचार वेळेत मिळत आहेत. काही अडचणी असतील, तर खासदार चिखलीकर व त्याच्या संपर्क कार्यालयात संपर्क करावा,’ असे आवाहन केले.मराठवाडा लोकसभा महाविजय प्रमुख प्रवीण साले, उत्तर विधानसभा प्रमुख मिलींद देशमुख, सरचिटणीस संजय घोगरे, बाळू बाबर, अनिलसिंह हजारी, भारत कदम, मंगेश कदम, संग्राम मोरे, अनिल मोरे यांच्यासह आदी उपस्थित होते. कोष्ठेवाडी येथील बाळू मामाच्या मेंढ्या या धार्मिक कार्यक्रमाच्या महाप्रसादात विषबाधा झाल्याची माहिती भल्या पहाटे बुधवारी खासदार चिखलिकर यांना कळाली. त्यांनी दिल्लीतून प्रशासनास तातडीने वैद्यकीय सेवा व इतर मदत पोहचविण्याची सूचना दिली. जिल्हा शल्यचिकित्सक यांना तातडीने औषधी उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले. पोलिस प्रशासन ,वैदयकीय यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते यांनी तत्काळ केलेल्या मदतीची प्रशंसा केली. निरीक्षक चिंचोळकर, महसूल प्रशासन, खासगी डॉक्टर, ग्रामस्थ या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले .माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MzOHbLa

No comments:

Post a Comment