मायामी : लिओनेल मेस्सीने हाँगकाँगला झालेल्या सामन्यात भाग न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते नाराज झाले होते. त्याची हुर्यो उडविण्यात आली होती. मात्र टोकियोतील व्हिसेल कोबविरुद्धच्या सामन्यात तो अर्धा तास का होईना खेळला. तरीदेखील मेस्सीच्या पाठिराख्यांचा हिरमोडच झाला. या ३० मिनिटांच्या खेळात गोल करण्याच्या सुरेख संधी मेस्सीने दवडल्या. ज्यामुळे त्याच्या इंटर मायामी संघास व्हिसेल कोबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. निर्धारित वेळेत मेस्सीने गोल करण्याची संधी गमावल्याने सामन्यात गोलशून्य बरोबरी झाली. अखेर पेनल्टी किकमध्ये व्हिसेलने ४-३ अशी बाजी मारली. मेस्सीने या दरम्यान पेनल्टी घेतली नाही, यामुळेही प्रेक्षकांच्या नाराजीत भर पडली.सामना संपण्यास अखेरची ३० मिनिटे शिल्लक असताना मेस्सी मैदानात आला. ८०व्या मिनिटाला त्याला सहज गोलची संधी होती. मेस्सीने गाफील राहत ती संधी सार्थकी लावली नाही. त्याची एक संधी व्हिसेलचा गोलकीपर आरियाने रोखली, तर दुसऱ्या संधीच्या वेळी व्हिसेल कोबचा बचाव भेदण्यात मेस्सी अपयशी ठरला. यामुळे टोकियो राष्ट्रीय स्टेडियममध्ये उपस्थित २८,६१४ प्रेक्षक निराश झाले.हाँगकाँगला पार पडलेल्या सामन्यात तर मेस्सीने भागही घेतली नव्हता. दुखापतीमुळे तो पूर्णवेळ राखीव खेळाडूंच्या बाकावर बसून होता. यामुळे तो प्रदर्शनीय सामना बघण्यास आलेल्या प्रेक्षकांनी मेस्सीचे हुर्यो उडवली अन् आयोजकांकडून तिकिटांचे पैसे परत मागितले होते.त्या दुखापतीतून आपण सावरल्याचे संकेत मेस्सीने मंगळवारी दिले होते. त्याप्रमाणे तो टोकियोमध्ये खेळलाही. मात्र त्याचे योगदान शंभर टक्के दिसले नाही. सामन्यातील पेनल्टी किकच्यावेळी मेस्सीने पेनल्टी किक का घेतली नाही, याचे कारणही मायामी संघाचे प्रशिक्षक गेरार्डो मार्टिनो यांनी स्पष्ट केले नाही. हाँगकाँग सरकार नाराजजपानमधील इंटर मायामी विरुद्ध व्हिसेल कोब या लढतीनंतर लगेचच हाँगकाँग सरकारने नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी दुखापतीचे कारण देत हाँगकाँगमध्ये न खेळलेला मेस्सी जपानमध्ये कसा खेळला?, असा सवाल हाँगकाँगकडून उपस्थित करण्यात आला आहे. 'आयोजक आणि सहभागी संघांनी हाँगकाँगच्या नागरिकांना योग्य ते स्पष्टीकरण द्यावे. तसेच, या फुटबॉलप्रेमींच्या इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत,' असे हाँगकाँगच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन कार्यालयाने म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/A5DuFQT
No comments:
Post a Comment