Breaking

Tuesday, February 27, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा सलग दुसरा विजय, आठ गडी राखून गुजरात जायंट्सचा पराभव https://ift.tt/nRj1bSD

महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)ने गुजरात जायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला. मंगळवारी (२७ फेब्रुवारी) दोन्ही संघ बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले. आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात संघाने २० षटकांत सात विकेट गमावत १०७ धावा केल्या. आरसीबीने १२.३ षटकात २ बाद ११० धावा करत सामना जिंकला.आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधनाने सर्वाधिक ४३ धावा केल्या. सबिनेनी मेघनाने २८ चेंडूत ३६ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. तिने पाच चौकार आणि एक षटकार मारला. एलिस पेरीने १४ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. तिने चार चौकार मारले. सोफी डिव्हाईन सहा धावा करून बाद झाली. ॲश्ले गार्डनर आणि तनुजा कंवर यांना प्रत्येकी एक यश मिळाले. दरम्यान गुजरातकडून दयालन हेमलताने सर्वाधिक नाबाद ३१ धावा केल्या. हरलीन देओलने २२ आणि स्नेह राणाने १२ धावा केल्या. या तिघांशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा पार करता आला नाही. वेदा कृष्णमूर्ती नऊ धावा करून बाद झाली. कर्णधार बेथ मुनीने आठ धावा, ऍशले गार्डनरने सात धावा, फोबी लिचफिल्डने पाच धावा आणि कॅथरीन ब्रायर्सने तीन धावा केल्या. तनुजा कंवरने नाबाद चार धावा केल्या. आरसीबीकडून सोफी मोलिनक्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. रेणुका सिंह ठाकूर यांना दोन यश मिळाले. जॉर्जिया वेरहॅमने एक विकेट घेतली.आरसीबीने गुजरात जायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला. संघाने मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. यापूर्वी आरसीबीने यूपी वॉरियर्सचा पराभव केला होता. या विजयासह आरसीबीचे दोन सामन्यांतून चार गुण झाले आहेत. त्याचवेळी गुजरातला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/S1PjEGi

No comments:

Post a Comment