Breaking

Tuesday, February 27, 2024

आधी 'जय श्रीराम' टाळलं, आता रामनामाचा जप, भाजपवासी झाल्यानंतर अशोकरावांची भाषण स्टाईल चर्चेत https://ift.tt/pNx1XRZ

नांदेड: 'जय श्री राम' म्हणण्यावरून अशोक चव्हाण हे चांगलेचं ट्रोल झाले आहेत. भाजपवासी झाल्यानंतरही त्यांनी 'जय श्री राम' न म्हणता 'भारत माता की जय'चा नारा दिला. त्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आज पार पडलेल्या भाजपाच्या लोकसभा बूथ कार्यकर्ता संमेलनात अशोक चव्हाण यांनी चक्क जय श्री रामाचा नारा देऊन आता मी भाजपात आलो ना, असं म्हणून भाषणाला सुरुवात केली. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपातर्फे आज विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे लोकसभा बूथ कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाला मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताच कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम' च्या नारा सुरु केला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी देखील 'जय श्री राम.. जय जय श्री राम..भारत माता की जय' म्हणत आता मी भाजपमध्ये आलो ना, असं चव्हाण उपस्थितांना म्हणाले. चव्हाण यांनी 'जय श्री राम' म्हणताच उपस्थित मान्यवरांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. दरम्यान विकसित भारतचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात चांगले काम करत आहेत. ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत, त्याचं प्रमाणे 'अब की बार..चार सौ पार', अशी भावना देशातील प्रत्येक नागरिकांची आहे. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेडचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. बूथ कार्यकर्ता महत्वाचा दुवाभाजप पक्षात बूथ प्रमुख अत्यंत महत्वाचा दुवा आहे. पक्षासाठी बूथ कार्यकर्ता तन, मन, धन लावून काम करतो. नागरिकांचे कडू बोलणे ऐकत असतो, असे असूनही पक्षाला शुन्यापासून सत्तेपर्यंत बसविणारे बूथ प्रमुखच असतात. त्यामुळे बुथ जिंकला तर मोदी जिंकतील. अबकी बार ४०० पार, असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. या अनुषंगाने सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी कार्यकर्त्यांना केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Nam8okF

No comments:

Post a Comment