पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात कालवा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पुणे शहर तसेच पुणे जिल्हाचे सर्व आघाडीचे नेते उपस्थित होते. पाणी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार पाबळ येथे बैलगाडा शर्यतीला पोहचले. दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाणी संदर्भात माहिती देत असताना पाबळ येथील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. त्यानंतर वळसे पाटील भर सभेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पाटील यांनी भाषण थांबवलं. शिरूर लोकसभा मतदारसंघात मध्ये शरद पवार यांनी स्वत: लक्ष घालायला सुरूवात केली आहे. तसेच अमोल कोल्हे यांना पक्षात राहण्याची मागणी केल्यानंतर शरद पवारांसाठी सुद्धा शिरूर लोकसभेची जागा निवडूण आणणं हे प्रतिष्ठेचं झालं आहे. दोन दिवसांपूर्वी स्वत: शरद पवार यांनी मंचर येथे सभा घेतली आहे. त्याचाच परिणाम आज दिसला आहे का? अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. पाणी प्रश्नासंदर्भात १२ गावचे शेतकरी नाराज असल्याचं तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. याचाच फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये वळसे पाटील यांना भोगावा लागणारे आहे का? अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आज पुण्यातील सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा आणि पुणे शहर यांची कालवा समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार गटाचे नेते सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेश टोपे उपस्थित होते. त्यासोबत मंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. बैठीकानंतर दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या नियोजित दौऱ्यानुसार पाबळ येथे प्रस्थान केलं. बैलगाड्या शर्यतीचा कार्यक्रम त्याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. बैलगाडा शर्यती कार्यक्रम संपल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी भाषण सुरू केलं. कालव समितीच्या पाणी प्रश्न संदर्भात शेतकरी आणि तिथल्या ग्रामस्थांना माहिती देत होते. दरम्यान सभेला जमलेल्या शरद पवार गटाच्या नेत्याने भाषण सुरू असतानाच घोषणा द्यायला सुरूवात केली. म्हणून सभास्थळी एकच गोंधळ उडाला. दिलीप वळसे पाटील यांनी आपलं भाषण थांबवलं. ते म्हणाले की, तुमचं जेवढं प्रेम शरद पवार साहेबांवर आहे, तेवढच प्रेम माझं पण आहे. मी गेले ४० वर्ष शरद पवार यांच्या सोबत काम केलं आहे. पण काही राजकीय प्रश्न असतात म्हणून निर्णय घ्यावा लागतो. ते आता मी इथे बोलत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय परिस्थिती काय वळण घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bxHTph8
No comments:
Post a Comment