म. टा. प्रतिनिधी, जालना : आरक्षणातील सगेसोयर तरतुदीचे कायद्यात रूपांतर करून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक-दोन दिवसांत बोलावण्याची मागणी करून मनोज पाटील जरांगे यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केली. ‘राज्य मागास आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्या, अंतरवाली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनात दाखल गुन्हे तातडीने परत घ्या, हैदराबाद संस्थान, मुंबई गव्हर्न्मेंट आणि सातारा संस्थानचे गॅझेटला शासकीय दर्जा देऊन शिंदे समितीकडे द्या,’ अशा मागण्या त्यांनी केला.‘भुजबळांना राज्याचे पोलिस द्या’मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करता ते म्हणाले, ‘भुजबळांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्व पोलिस द्या, आता ते म्हातारे झाले आहेत, त्यांना कोण मारणार? रायगडच्या रस्त्यात टेम्पो आमच्या गाडीवर घालून मारण्याचा प्रयत्न झाला आतापर्यंत सात वेळा असे घडलेले आहे आम्ही असे सरकारला सांगत फिरत नाही.’‘शिंदे समितीला मुदतवाढ द्या’‘एकूण ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यापैकी चाळीस लाख प्रमाणपत्रे वितरित केली आहेत. बाकीच्याच्या वंशावळी जुळवण्याचे काम सुरू आहे; पण कुणबी प्रमाणपत्रे दिलेल्या परिवाराच्या लोकांना शपथपत्राच्या आधारावर देण्यात काय अडचण आहे? मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची शिबिरे बंद केली आहेत. राज्यातील फक्त आठ टक्के ग्रामपंचायतींत कुणबी नोंदी जाहीर लावलेल्या आहेत. आपली नोंद सापडल्याचे अनेक जणांना माहीत नाही, त्यामुळे शिंदे समितीला एक वर्षासाठी मुदतवाढ द्या,’ अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणाछगन भुजबळांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनी आवरावे, त्याला बळ देऊ नका, असे म्हणत जरांगे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला भुजबळ थांबले नाहीत तर आम्ही मंडल आयोगाला न्यायालयात आव्हान देऊ. राज्यात गुन्हेगारांना पोलिस संरक्षण देण्याचा त्यांचे जो ऐकेल त्याचे गुन्हे मागे घेण्याचा त्याचा सत्कार करायचा नवीन नियम गृह मंत्रालयाने आणला आहे आणि निरपराध मराठा समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल करायचा नवीन नियम त्यांनीच आणलाय असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता जरांगे पाटील यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला.चर्चेची दारे उघडी असल्याचे सांगून, सरकारकडून आजपर्यंत कोणीच संपर्क केलेला नाही. आम्ही सांगितल्याप्रमाणेच सगेसोयरे शब्दाची व्याख्या करावी.-मनोज जरांगे, नेते, मराठा आरक्षण
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LSsdMxC
No comments:
Post a Comment