गौरव गुप्ता : 'व्हॅलेण्टाइन डे'च्या पार्श्वभूमीवर प्रेमिकांचा खास दिवस सुरू झाला आहे. अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखी शक्कल, विशेष स्थान निवडत असतात. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने निवडलेली जागा मात्र सगळ्यांपेक्षा वेगळी होती. ती जागा त्याच्यासाठी कोणत्याही पवित्र जागेइतकीच महत्त्वाची होती. 'व्हॅलेण्टाइन डे'निमित्त रोहित शर्माला एका कार्यक्रमात याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा, 'जिथून मी माझी क्रिकेट कारकीर्द सुरू केली, त्याच मैदानावर नेऊन मी तिच्याकडे माझे प्रेम व्यक्त केले आणि लग्नाबाबत विचारणा केली', असे रोहितने सांगितले. त्याने नेमकी जागा सांगणे टाळले, मात्र त्याचे लहानपणापासूनचे प्रशिक्षक दिनेश लाड त्याबाबत जाणून होते. ही गुलाबी घटना घडली होती बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनच्या एमएचबी येथील मैदानात. 'बोरिवली पश्चिमेकडील या मैदानात मी त्याला पहिल्यांदा पाहिले होते. १९९९चा मे महिना होता. तेव्हा रोहित १२ वर्षांचा होता. रोहित तेथील खासगी क्रिकेट प्रशिक्षण घेत होता. मी त्याला दुरूनच १२ चेंडू टाकताना बघितले आणि त्याला स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश दिला. नव्या वर्षात मी त्याला फलंदाजीत वरचा क्रमांक दिला. त्यानंतर काय घडले हे सगळेच जाणतात', असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या दिनेश लाड यांनी सांगितले.रोहितची पत्नी रितिका साजदेह ही कमालीची क्रिकेटवेडी आहे. रोहित मुंबई इंडियन्स किंवा भारताकडून खेळत असताना ती कायम मैदानात दिसत असते. मंदिरा बेदी यांनी रितिकाला रोहित हा रोमँटिक आहे का, असे विचारले होते. त्यावर आपण खूप गंभीरपणे बोलत आहोत, असे रितिकाने दाखवले होते, पण प्रत्यक्षात विनोद करीत म्हणाली होती, 'नाही'. रोहित आणि रितिका यांची पहिली भेट एका कार्यक्रमा दरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि रोहितने तिला प्रपोज केले. रितिकाही रोहितला यावेळी चांगलीच ओळखत होती. त्यामुळे रितिकाला नकान देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर रोहित आणि रितिका यांची लव्ह स्टोरी फुलली. या दोघांनी त्यानंतर लग्न केला आणि आता मुलगी समायरा ही त्यांच्या आयुष्याच्या एक अविभाज्य भाग बनली आहे.
मुलीसाठी गायला आवडते
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना, मुलगी समायरासाठी 'द लायन किंग'मधील सर्कल ऑफ लायन हे गाणे गायला खूप आवडते, असे रोहितने सांगितले. दडपण दूर करण्यासाठी तो विनोदी चित्रपट पाहणे जास्त पसंत करतो. आपल्याला राजपाल यादवचे चित्रपट खूप आवडतात, असे सांगणाऱ्या रोहितने 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट खूप आवडल्याचेही सांगितले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/80BEWvX
No comments:
Post a Comment