Breaking

Friday, March 8, 2024

एकीकडे दौरे अन् गाठीभेटी, दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची गळाभेट, चर्चांना उधाण https://ift.tt/371OQ5K

दीपक पडकरबारामती: राज्याच्या राजकारणात बारामती सध्या केंद्रस्थानी आहे. त्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाल्याने राजकारणात घडामोडी घडत आहेत. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असल्याची चर्चा असताना त्यांनी तसा प्रचार देखील सुरू केला आहे. मात्र त्यात आज रात्री बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता समोरासमोर आल्या. त्यावेळी त्यांची गळाभेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या देखील चांगल्याच ॲक्टिव झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत. तसेच इतर तालुक्याचे दौरे देखील करत त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदार संघात दौरे सुरू केले आहेत. गावच्या जत्रांमध्ये देखील सुप्रिया सुळे आता जाताना दिसत आहेत. त्यात आज गळाभेट झाल्याचे सर्व काही आलबेल असल्याचे पाहायला मिळाले. येणाऱ्या काळात दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या राहणार असल्या तरी आजच्या भेटीने राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी होईल का हाच खरा प्रश्न आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PrBfdLJ

No comments:

Post a Comment