Breaking

Friday, March 8, 2024

अन्यथा या निवडणुकीनंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, प्रकाश आंबेडकरांचा कॉंग्रेसला सल्ला https://ift.tt/xDeSKkg

कोल्हापूर: आम्ही फकीर आहोत. कधी या मस्जिदमध्ये तर कधी त्या मंदिरमध्ये असतो. आम्ही कोणतीही चोरी केली नाही ना सबसिडी खाल्ली, ना कोणते कारखाने काढले. यामुळे आम्ही ठामपणे मोदींना पाहिजे ते बोलू शकतो. महाविकास आघाडीसोबत युती व्हावी, आमची भावना आहे. मात्र एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी सांगावं की काँग्रेसच्या अध्यक्षांवर ईडीची चौकशी आहे की नाही. त्यांच्यावर ईडीची चौकशी असल्याने ते भाजप विरोधात कोणतीही भूमिका घेत नाहीत आणि ते आम्हाला शहाणपणा सांगत आहेत की तुम्ही बीजेपीला मदत करणार म्हणत आरोप करत आहात. तुम्ही इलेक्शन लढू नका. मात्र आम्ही बीजेपीला झोपवल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज इचलकरंजीमध्ये सभेत बोलत होते.राज्यात महाविकास आघाडी सोबत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे इच्छुक आहेत. मात्र जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने प्रकाश आंबेडकर आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून काँग्रेसमध्ये नवीन, चांगल्या आणि जिंकून येणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जात नाही पण घराणेशाही पोसत राहत आहेत आणि यामुळे याचा फायदा नरेंद्र मोदी घेतात. आपल्याला लोकशाही आणायची आहे की घराणेशाही असे विचारतात. मोदी म्हणतात या देशातील जनता हेच माझं परिवार आहे. मोदीजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. मात्र त्यातील एक माणूस तुम्हाला अधिक महत्त्वाचा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाला एक फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्ममध्ये मोदींनी माझं लग्न झालं आहे असं लिहिलं आहे. माझी बायको जिवंत आहे, असे लिहिले आहे. मग मोदीजी तुम्ही या विशेष माणसाला तुमच्यासोबत ठेवा आणि कुटुंब चालवा आणि मग आम्ही म्हणू आम्ही तुमच्या कुटुंबाचे सदस्य आहोत. मोदी हे सनातन हिंदू धर्मातील संस्कृती पाळत नाहीत. मग तुम्ही कुठल्या तोंडाने मत मागायला जाणार आहात. मोदी बोलतात एक आणि वागतात दुसरच. मी काँग्रेसच्या महिला आघाडीला एक कार्यक्रम सुचवला होता. त्यांनी मोदींच्या घरासमोर जाऊन मोदींनी आपल्या पत्नीसोबत एकत्र राहावं म्हणून धरण आंदोलन करायला सुचवलं होत. मात्र ते करू शकले नाहीत त्यांना साधं एक आंदोलन करण्याची हिम्मत नाही. ते आम्ही बीजेपी बरोबर लढलं पाहिजे, असे सांगत आहेत. मात्र काँग्रेसने आधी स्वतः लढायला सुरुवात करावी आणि मग आम्हाला उपदेश करावा, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केले आहे.हा देश आणखी देखील वाचलेला आणि जुळलेला आहे. अद्याप तुटलेला नाही. सध्याचं भाजपचं सरकार हे संविधान तुडवायला निघालं आहे. ते जे चातुर्यवर्ण आणायला निघाले आहेत अशांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. यासाठी एक लाट निर्माण करायची तुम्हाला चांगली संधी होती. मात्र ते सोडून जे मोदींच्या विरोधात लढतात त्यांच्याबद्दल तुम्ही शंका उपस्थित करत आहात. काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री तुमचा गेला दुसरा राहिला आहे. त्याला सुद्धा आपल्यातील एकीमध्ये बिघाड करण्याचा अजेंडा देण्यात आलेला आहे. त्याने एकीबद्दल बिगार केली तर मे जून मध्ये कुठेतरी राज्यपाल म्हणून जाणार, अशी ऑफर देण्यात आली आहे असा गौप्यस्फोट देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे. यामुळे अशा सुपारीबाज लोकांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमधून काढून फेकून द्यावं. म्हणजे काँग्रेस वाढायला सुरुवात होईल, अन्यथा या निवडणुकीनंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी आणि मोदी सरकार यांच्या कामकाजावर देखील निशाणा साधला असून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात एअर फोर्सची वाट लावली आहे. मनमोहनसिंग यांच्या कालावधीत फ्रेंच सरकारकडून १३५ फायटर विमान विकत घ्यायची होती. मध्यंतरी बातमी आली की रशियाकडून आलेले मिग २१ आता चालणार नाही. त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. एअर फोर्सच एक स्कॉर्डन सुरू करायचं असेल तर १३५ फायटर जेट तेथे लागतात. मात्र मोदींनी आणले किती ३५ मग बाकीचे १०० गेले कुठे? दहा वर्षांपूर्वी मोदींनी सांगितलं होत की अंबानी हे विमान आणून देईल. मग आता दहा वर्ष होत आले. मग मोदींनी आता पहिल्यांदा सांगावं की उरलेले शंभर विमान येणार कधी? एअर फोर्स त्याची वाट बघत आहेत. खरंतर नरेंद्र मोदी हे सैन्य दलाला खोकला करणारे पंतप्रधान आहेत. हे पूर्णपणे खोटारडं आणि लुटारूंचं सरकार आहे. तुम्ही या देशाचा संरक्षण कसं करणार, ज्यांनी या संरक्षणाचा खेळ केला आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करता कामा नये, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nRNID60

No comments:

Post a Comment